शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

निवडणुकीतील पैशांवर आयकर विभागाचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 9:50 PM

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्देशांनुसार आयकर विभागाकडून लोकसभा निवडणुकीतील पैशांवर आयकर विभागाकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. यासाठी विभागातर्फे विदर्भ आणि मराठवाड्याच्या २४ जिल्ह्यांसाठी ‘क्यूआरटी’ (क्विक रिस्पॉन्स टीम) तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात आयकर विभागाचे प्रधान संचालक ‘इन्व्हेस्टिगेशन’ (विदर्भ-मराठवाडा) जयराज काजला यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.

ठळक मुद्देविदर्भ-मराठवाड्यासाठी २४ जिल्ह्यांत ‘क्यूआरटी’ : नोडल अधिकाऱ्यांचीदेखील नियुक्ती

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्देशांनुसार आयकर विभागाकडून लोकसभा निवडणुकीतील पैशांवर आयकर विभागाकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. यासाठी विभागातर्फे विदर्भ आणि मराठवाड्याच्या २४ जिल्ह्यांसाठी ‘क्यूआरटी’ (क्विक रिस्पॉन्स टीम) तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात आयकर विभागाचे प्रधान संचालक ‘इन्व्हेस्टिगेशन’ (विदर्भ-मराठवाडा) जयराज काजला यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.निवडणुकीदरम्यान बेकायदेशीरपणे रोख रकमेचा व्यवहार होतो. या रकमेला जप्त करण्यासाठी आयकर विभागाने विदर्भातील १० आणि मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांमध्ये ‘क्यूआरटी’ तयार करण्यात आली आहे. दोन्ही क्षेत्रांसाठी दोन नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहे. एसजीपी मुदलियार यांना विदर्भ क्षेत्राचे तर अमित कुमार सिंह यांना मराठवाडा क्षेत्राचे नोडल अधिकारी बनविण्यात आले आहे. यांच्या अंतर्गत प्रत्येक लोकसभा क्षेत्रात एक-एक सबनोडल अधिकारी, पडताळणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. यांच्यासोबत आयकर निरीक्षकांचे पथक काम करेल. यासोबतच विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकसभा क्षेत्रांसाठी आयकर विभागाने ७०-७५ अधिकाऱ्यांचे पथक तैनात केले आहे. यांची व्यवस्था ‘स्पेशल टास्क फोर्स’तर्फे करण्यात आली आहे, असे काजला यांनी सांगितले.निवडणुकीतील रक्कम जप्त करण्यासाठी आयकर विभागातर्फे जिल्हा प्रशासन, पोलीस, सीआयएसएफ, आरपीएफ, उत्पादन शुल्क विभागासोबत समन्वय साधला जात आहे. या विभागांमधून बेकायदेशीर रोख रक्कम मिळाल्याची सूचना मिळताच ‘क्यूआरटी’ त्वरित कारवाई करेल. व्यापाऱ्यांनीदेखील योग्य दस्तावेज सोबत घेऊनच रोख रक्कम बाळगावी, असे आवाहन काजला यांनी केले. पत्रपरिषदेला विदर्भ क्षेत्राचे नोडल अधिकारी एसजीपी मुदलियार उपस्थित होते.सराफ चेंबर्समध्ये ‘कंट्रोल रुम’आयकर विभागाने नागपुरातील सदर येथील सराफ चेंबर्स येथे ‘कंट्रोल रुम’ची स्थापना केली आहे. १८००२३३३७८५ हा टोल फ्री क्रमांकदेखील जारी केला आहे. यावर निवडणूकांसाठी वापरण्यात येणाºया बेकायदेशीर रोख रकमेची २४ बाय ७ सूचना दिली जाऊ शकते. यासोबतच ९४०३३९१६६४ या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांक किंवा २५२५८४४ या लँडलाईनवरदेखील माहिती दिली जाऊ शकते, असे काजला यांनी सांगितले.‘चार्टर्ड प्लेन’, ‘हेलिकॉप्टर’वरदेखील नजरआयकर विभागाच्या मराठवाडा व विदर्भ क्षेत्रात एकूण सहा विमानतळ आहे. यात नागपूर, औरंगाबादसोबतच गोंदिया, नांदेड, जळगाव आणि नाशिक येथील विमानतळांचा समावेश आहे. या विमानतळांवरदेखील आयकर विभागाने आपल्या ‘एअर इंटेलिजन्स युनिट’ला तैनात केले आहे. युनिटतर्फे नियमित विमानांच्या तपासणीसोबतच ‘चार्टर्ड प्लेन’ आणि ‘हेलिकॉप्टर्स’वरदेखील नजर ठेवण्यात येईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय