नागपुरात 'कोका-कोला'च्या बॉटलिंग कंपनीवर आयकर विभागाची धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:43 IST2026-02-19T16:38:55+5:302026-02-19T16:43:14+5:30

Nagpur : उपराजधानीच्या औद्योगिक क्षेत्रात मंगळवारी खळबळ उडाली. आयकर विभागाच्या दिल्लीतील पथकाने 'कोका-कोला' या जगप्रसिद्ध शीतपेय कंपनीची फ्रँचायझी असलेल्या 'सुपीरिअर ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेड'च्या बुटीबोरी येथील प्लांटवर अचानक छापा टाकला.

Income Tax Department raids Coca-Cola bottling company in Nagpur | नागपुरात 'कोका-कोला'च्या बॉटलिंग कंपनीवर आयकर विभागाची धाड

Income Tax Department raids Coca-Cola bottling company in Nagpur

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
उपराजधानीच्या औद्योगिक क्षेत्रात मंगळवारी खळबळ उडाली. आयकर विभागाच्या दिल्लीतील पथकाने 'कोका-कोला' या जगप्रसिद्ध शीतपेय कंपनीची फ्रँचायझी असलेल्या 'सुपीरिअर ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेड'च्या बुटीबोरी येथील प्लांटवर अचानक छापा टाकला. सकाळी सुरू झालेली ही तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईची औद्योगिक वर्तुळात चर्चा होती.

प्राप्त माहितीनुसार, या कारवाईची मुख्य सुत्रे दिल्लीशी जोडलेली आहेत. कोका-कोला कंपनीचे मुख्य कार्यालय दिल्लीत असल्याने आणि व्यवहारांमधील काही संशयास्पद बाबी दिल्लीच्या रडारवर असल्याने, तेथून विशेष पथक नागपुरात दाखल झाले. या मोहिमेत आयकर विभागाच्या नागपूर पथकानेही स्थानिक पातळीवर सहकार्य केले.

'सुपीरिअर ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी कोका-कोला ब्रँडच्या उत्पादनांची निर्मिती, पॅकेजिंग आणि वितरणाचे काम पाहते. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या मुख्य प्लांटमध्ये मंगळवारी सकाळीच आयकर अधिकारी धडकले. पथकाने कंपनीच्या गेल्या काही वर्षांतील आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल डेटा ताब्यात घेतला. सकाळपासून सुरू झालेली ही 'सर्च' मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यादरम्यान कुणालाही प्लांटच्या आत किंवा बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.

कारवाईचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात

ही कारवाई नेमकी कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याबाबत आयकर विभागाने अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावरील करचोरी किंवा आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून हा छापा टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीतील मुख्य कार्यालयाशी संबंधित असलेल्या आर्थिक व्यवहारांच्या तपासाचा हा एक भाग असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

Web Title : नागपुर में 'कोका-कोला' बॉटलिंग प्लांट पर आयकर विभाग का छापा

Web Summary : नागपुर के बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र में 'कोका-कोला' के बॉटलिंग प्लांट पर आयकर विभाग ने छापा मारा। दिल्ली की टीम ने वित्तीय अनियमितताओं के संदेह में तलाशी का नेतृत्व किया। दस्तावेज और डिजिटल डेटा जब्त किए गए। छापे का कारण अज्ञात है, संभवतः कर चोरी है।

Web Title : Income Tax Raid on Coca-Cola Bottling Plant in Nagpur

Web Summary : Income Tax officials raided Coca-Cola's bottling plant in Nagpur's Butibori industrial area. Delhi team led the search, suspecting financial irregularities. Documents and digital data were seized. The reason for the raid remains undisclosed, possibly tax evasion.

टॅग्स :nagpurनागपूर