ई-बाईक टॅक्सी कोणत्या शहरात धावणार, किती असेल भाडे? तीन कंपन्यांना परवाना मिळण्याची शक्यता
By सुमेध वाघमार | Updated: November 14, 2025 17:43 IST2025-11-14T17:42:27+5:302025-11-14T17:43:20+5:30
Nagpur : एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी राज्य परिवहन प्राधीकरणाने मंजुर दिली आहे.

In which city will e-bike taxis run, how much will the fare be? Three companies likely to get licenses
सुमेध वाघमारे
नागपूर: सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणारी ‘ई-बाईक टॅक्सी’ आता राज्यभर धावण्याच्या उंबरठ्यावर आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रायोगिक धावणाऱ्या तीन प्रमुख कंपन्यांना कायम परवाना मिळण्याची शक्यता वाढली असून, पुढचा निर्णायक टप्पा १५ विशेष निरीक्षकांच्या तपासणीवर अवलंबून आहे
एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी राज्य परिवहन प्राधीकरणाने मंजुर दिली आहे. ‘महाराष्टÑ बाईक टॅक्सी नियम-२०२५‘ मधील तरतुदीची पुर्तता एक महिन्यांच्या आत करण्याच्या अटीवर उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., रोपेन ट्रान्सपोर्टेशन्स सव्हिसेस प्रा.लि. रॅपिडो व अॅनी टेक्नोलॉजीस प्रा. लि. या तीन कंपन्यांना मुंबई महानगर क्षेत्राकरीता तात्पुरते लायसन्स देण्यात आले. होते. आता या कंपन्यांची कसून तपासणी करण्यासाठी प्रत्येक कंपनीसाठी पाच अशा एकूण १५ मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या महत्त्वाच्या अटींची होणार तपासणी
- कंपनीकडे किमान ५० इलेक्ट्रीक बाईक महाराष्ट्रात नोंदणीकृत आहेत की नाही.
- सर्व वाहनांकडे वैध वाहन परवाना, विमा आणि फिटनेस प्रमाणपत्र आहे का.
- वाहन आणि चालकासाठी प्रवासी आणि चालक दोघांनाही कव्हर करणारी विमा पॉलिसी आहे का.
- प्रवासी आणि चालक दोघांकडेही आयएसआय मार्कचे हेल्मेट आहे का.
- वाहनांवर स्पष्टपणे ‘बाईक टॅक्सी’ लिहिलेले आहे का.
- जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालिन बटण आणि कार्यरत नियंत्रण कक्ष सुविधा आहेत का.
- चालकाकडे वैध कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स आहे का.
- चालकाचे वय आणि पात्रता नियमांनुसार आहेत का.
- १५ किमी प्रवासाच्या अंतराची मर्यादा पाळली जाते का.
- निश्चित भाडेदराचे नियम पाळले जातात का.
- ग्राहकांसाठी तक्रार निवारण प्रणाली कार्यरत आहे का.
- महिला प्रवाशांसाठी सुरक्षेची विशेष तरतूद करण्यात आली आहे का.
यासह इतरही अटींची तपासणी केली जाणार आहे, त्यानंतरच 'ई-बाईक टॅक्सी'ला हिरवा सिग्नल मिळणार आहे.