आरटीओच्या अधिकाऱ्यांनी रक्तदान करून दिला नवा संदेश 

By सुमेध वाघमार | Published: February 2, 2024 06:13 PM2024-02-02T18:13:49+5:302024-02-02T18:15:01+5:30

आरटीओच्या अधिकाऱ्यांनी रक्तदान करून नवा संदेश दिला आहे.

in nagpur rto officials gave a new message by donating blood | आरटीओच्या अधिकाऱ्यांनी रक्तदान करून दिला नवा संदेश 

आरटीओच्या अधिकाऱ्यांनी रक्तदान करून दिला नवा संदेश 

सुमेध वाघमारे, नागपूर : दानात रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो.  त्याचे आंतरिक समाधान जगातील मोठ्यातमोठ्या ऐश्वर्यापेक्षा जास्त मोलाचे असते, हे माहित असतानाही अनेक लोक भ्रामक कल्पनेतून रक्तदान करीत नाही. ते दूर करण्यासाठी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी रक्तदान करून नवा संदेश दिला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (शहर) व नागपूर (ग्रामीण) आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर (पूर्व) यांचे मार्फत संयुक्तरित्या रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने या तिन्ही कार्यालये मिळून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह अधिकारी व कर्मचाºयांनी रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके , राहुल वंजारी, होमेश काळे, वंदना गडकरी, श्रीराम पारसे आदी उपस्थित होते.

रविंद्र भूयार म्हणाले, रस्ता अपघातात जखमी झालेल्यांना अचानक रक्ताची गरज पडते. ती गरज भरुन काढण्यासाठी प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. शिबिराच्या आयोजनासाठी अर्पण स्वयंसेवी रक्त केंद्राचे डॉ. खेडीकर, सत्यम सिंग, विरांगणा गौकाले, अंकुशा व गजानन कन्हाळे यांनी सहकार्य केले.

Web Title: in nagpur rto officials gave a new message by donating blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.