शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित एलबीटी नियमांना धक्का नाही

By admin | Updated: January 9, 2016 03:30 IST

मुंबइ उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुधारित स्थानिक संस्था कर (एलबीटी ) नियमांविरुद्ध दाखल दोन रिट याचिका तक्रारीत काहीच गुणवत्ता नसल्याचा निष्कर्ष नोंदवून फेटाळून लावल्या आहेत.

हायकोर्टाने फेटाळल्या याचिका : तक्रारीत गुणवत्ता नसल्याचा निष्कर्षनागपूर : मुंबइ उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुधारित स्थानिक संस्था कर (एलबीटी ) नियमांविरुद्ध दाखल दोन रिट याचिका तक्रारीत काहीच गुणवत्ता नसल्याचा निष्कर्ष नोंदवून फेटाळून लावल्या आहेत. यामुळे सुधारित नियम जैसे थे लागू राहणार असून त्यांना कोणत्याही स्वरूपाचा धक्का पोहोचलेला नाही.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी शुक्रवारी हा निर्णय घोषित केला. विदर्भ डिस्टिलर्स व नागपूर डिस्टिलर्स यांनी सुधारित नियमांच्या वैधतेला आव्हान दिले होते. १७ डिसेंबर २०१५ रोजी दोन्ही याचिकांवर अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. सुधारित नियमांमुळे याचिकाकर्ते कोणत्याही प्रकारे प्रभावित होत नाहीत. सुधारित नियम लागू होण्यापूर्वी त्यांना बाजू मांडण्याची संधी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शासनास निवेदन सादर केले होते. यासह विविध मुद्दे लक्षात घेता याचिकाकर्त्यांच्या तक्रारी गुणवत्तारहीत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदविले आहे.राज्य शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियम-२०१० मधील नियम ३ व नियम १७ मध्ये दुरुस्ती केली आहे. यासंदर्भात १ आॅगस्ट २०१५ रोजी अधिसूचना काढण्यात आली आहे. सुधारित नियम १ आॅगस्ट २०१५ पासून लागू झाले आहेत. या नियमानुसार ५० कोटी व त्यापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनाच स्थानिक संस्था कर लागू होणार आहे. सुधारित नियम ३ मधील उपनियम १ अनुसार १ आॅगस्ट २०१५ नंतर वार्षिक ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खरेदी-विक्रीची उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना ‘एलबीटी’साठी नोंदणी करावी लागेल. तसेच सुधारित नियम १७ मधील उपनियम-१ च्या खंड-ख अनुसार १ आॅगस्ट २०१५ पूर्वी खरेदी-विक्रीची वार्षिक उलाढाल ५० कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या नोंदणीकृत व्यावसायिकांचे नोंदणी प्रमाणपत्र १ आॅगस्टपासून आपोआप रद्द झाल्याचे समजण्यात येईल. नवीन नियमाला महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) सुधारित नियम-२०१५ असे नाव देण्यात आले आहे. याविरुद्ध याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर तर, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)