शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

हाथरस हत्याकांडातील दोषींना तातडीने फाशीची शिक्षा द्या : समाजमन संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 23:18 IST

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या अमानवीय घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसाद गुरुवारी नागपुरातही उमटले.

ठळक मुद्देविविध पक्षांतर्फे ठिकठिकाणी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या अमानवीय घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसाद गुरुवारी नागपुरातही उमटले. विविध पक्षांनी व सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करीत आरोपींना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली.

फाशीच्या शिक्षेसाठी राष्ट्रपतींना निवेदनबहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका व माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे या या घटनेचा निषेध करीत या घटनेतील अरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सादर केले.युवा सेनेतर्फे कॅण्डल मार्चयुवा सेनतर्फे जिल्हा सचिव धीरज फंदी यांच्या नेतृत्वात कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी पीडितेला श्रद्धांजली अर्पण करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या कँडल मार्चमध्ये माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, संदीप पटेल, शशिकांत ठाकरे, निलेश तिघरे, सलमान खान, सचिन डाखोरे, विक्रम राठोड़, यश जैन, आशिष बोकड़े, बंटी धुर्वे, गौरव गुप्ता, हर्षल सावरकर, आशिष देशमुख, प्रवीण धावड़े, नितीन लोखंडे, कौशिक येलणे, आकाश पांडे, सिद्धू कोमेजवर, शंकर वानखेडे, राजेश बांडेबुचे, सनी अग्रवाल, मनीष साखरकर, शुभम अग्रवाल, पावन सावरकर आदी सहभागी होते.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे गोळीबार चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी मनीषा वाल्मिकीची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष रवी पराते यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात नुतन रेवतकर, मिलिंद मानापुरे, सौरभ मिश्रा, आशिष आवळे, संजय धापोडकर, संदीप मेंढे, स्वप्नील अहीरकर, राहुल कांबळे, अमित दुबे, शहनवाज खान, आकाश चौधरी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करापीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच आरोपींना पाठीशी घालणारे योगी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करा, अशी मागणी केली.नागपूर शहर महिला काँग्रेसनागपूर शहर महिला काँग्रेसतर्फे कॅण्डल मार्च काढून सक्करदरा येथील गांधी पुतळ्याजवळ मृत पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शहर महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, संगीता उपरीकर, अर्चना सिडाम, शालिनी सरोदे, बेबी गाडेकर, भारती कामडी, रेखा काटोले, प्रमिला धने, सुनीता मेहर, ज्योती धाके आदींसह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारagitationआंदोलनnagpurनागपूर