बेकायदेशीरपणे मुख्याध्यापक पद लाटले? प्रदीप बिबटेंना मिळालेला राज्य शिक्षक पुरस्कार परत घेण्याची मागणी
By निशांत वानखेडे | Updated: September 25, 2025 20:25 IST2025-09-25T20:23:34+5:302025-09-25T20:25:45+5:30
कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मागणी : प्रदीप बिबटेंना मिळालेला राज्य शिक्षक पुरस्कार परत घ्या

Illegally embezzled principal's post? Demand to take back state teacher award given to Pradeep Bibte
नागपूर : अनुसूचित जमातीच्या शिक्षकाचा हक्क डावलून बेकायदेशीरपणे मुख्याध्यापक पद लाटणारे विनायकराव देशमुख हायस्कूल, शांतीनगरचे मुख्याध्यापक प्रदीप बिबटे यांना २०२४ मध्ये राज्य सरकारतर्फे मुख्याध्यापक गटात मिळालेला सावित्रीबाई फुले गुणगाैरव पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने केली आहे.
संघटनेचे मुख्य संघटन सचिव परशराम गोंडाणे यांनी शासनाकडे ही मागणी केली आहे. खासगी शिक्षण संस्थेच्या शाळेत बिंदूनामावली अध्ययावत करून विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांचेकडून प्रमाणित करणे अनिवार्य आहे. पदोन्नती देतांना व शिक्षक अतिरिक्त ठरवितांना रोस्टर प्रमाणित केले की नाही, आरक्षणाच्या धोरणानुसार, बिंदूनामवालीनुसार प्रस्ताव सादर केला आहे की नाही, याची काटेकोर तपासणी शिक्षणाधिकारी यांनी करून कार्यवाही करने आवश्यक असते. मात्र प्रदीप बिबटे यांच्याबाबतीत, असे काही केल्याचे दिसून येत नाही.
प्रदीप बिबटे यांनी २०१७ पासून बेकायदेशीरपणे मुख्याध्यापक पदाचा फायदा घेतला. २०२४ मध्ये प्रस्ताव सादर करून राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले गुणगाैरव पुरस्कार मिळविला. ही शासनाची फसवणूक आहे. त्यामुळे शासनाने हा पुरस्कार वापस घ्यावा आणि २०१७ पासून दिलेले मुख्याध्यापक पदाचे वेतन वसुल करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. संघटनेतर्फे शिष्टमंडळात ऋषींद्रकुमार बसेशंकर, प्रबोध धोंगडे, नरेंद्र गजभिये, मधुकर मडावी, अरविंद कुंभरे, भीमराव सालवणकर, प्रमोद खोब्रागडे, राजू नवनागे, हितेश रामटेके, युवराज मेश्राम, प्रवीण मंडपे आदी शिक्षकांनी शासनाकडे केली आहे.