'तुझ्या पतीचा शोध लावतो' एकांतात पूजाविधी करण्याच्या बहाण्याने, मांत्रिकाने केला महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:02 IST2026-04-07T16:01:26+5:302026-04-07T16:02:33+5:30

Nagpur : हरवलेल्या पतीचा शोध घेण्याच्या बहाण्याने अमरावती जिल्ह्यातील एका भोंदू मांत्रिकाने विवाहित महिलेवर अत्याचार केला. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

'I'll find your husband': Bhondu baba rapes woman on pretext of performing a private puja | 'तुझ्या पतीचा शोध लावतो' एकांतात पूजाविधी करण्याच्या बहाण्याने, मांत्रिकाने केला महिलेवर अत्याचार

'I'll find your husband': Bhondu baba rapes woman on pretext of performing a private puja

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
हरवलेल्या पतीचा शोध घेण्याच्या बहाण्याने अमरावती जिल्ह्यातील एका भोंदू मांत्रिकाने विवाहित महिलेवर अत्याचार केला. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ताहीर रशीद बेग (६५, डब्बीपुरा, अंजनगाव, अमरावती), असे आरोपीचे नाव आहे. पीडित ३३ वर्षीय महिला धुणीभांडी करून आपला उदरनिर्वाह करते. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी तिचा पती कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला. त्यानंतर शोध घेतला असता तो मध्य प्रदेशात आढळून आला. 

नातेवाईकांच्या मदतीने त्या महिलेने त्याला परत नागपूरला आणले. त्यानंतर काहीच दिवसांत, म्हणजेच ३० ऑक्टोबर २०२५ रोजी तो पुन्हा घरातून निघून गेला. तेव्हापासून त्याचा ठावठिकाणा सापडलेला नाही. महिलेच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी महिला एका विवाह सोहळ्यात गेली असता तेथे तिची ओळख ताहीरसोबत झाली. ताहीरने स्वतःची ओळख एक मांत्रिक म्हणून करून दिली. हरवलेल्या पतीचा शोध घेण्याची आणि त्याला परत आणण्याची अतिंद्रिय शक्ती आपल्याकडे असल्याचा दावा त्याने केला. तिच्या घरी जाऊन एक विशेष विधी करण्याची त्याने बतावणी केली. महिलेच्या घरी पोहोचल्यानंतर, त्याने तिला एका खोलीत बोलावले. त्यानंतर महिलेच्या चुलत बहिणीला त्याने खोलीबाहेर जाण्यास सांगितले. 

त्याने महिलेच्या इतर नातेवाईकांना घरातील एका विशिष्ट ठिकाणी बसवले. समोर त्याने तेलाचा दिवा व उदबत्त्या प्रज्वलित केल्या आणि सर्वांना त्या दिव्याच्या ज्योतीकडे एकटक पाहण्याची सूचना दिली. काही वेळानंतर तो त्या महिलेला घराच्या वरच्या मजल्यावर घेऊन गेला. एकांतात पूजाविधी करण्याच्या बहाण्याने, त्याने त्या महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर त्या महिलेने घडलेल्या या संपूर्ण प्रकाराची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. नातेवाइकांच्या मदतीने महिलेने सक्करदरा ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ताहीरला अमरावतीतून अटक केली.
 

Web Title : पति को ढूंढने के बहाने तांत्रिक ने किया महिला से दुष्कर्म

Web Summary : नागपुर में एक तांत्रिक ने लापता पति को ढूंढने का वादा करके एक महिला से दुष्कर्म किया। उसने विशेष अनुष्ठान का लालच दिया, उसे अलग किया और अपराध किया। महिला की शिकायत पर पुलिस ने आरोपी को अमरावती से गिरफ्तार किया।

Web Title : Fake Tantrik Rapes Woman Under Pretext of Finding Her Husband

Web Summary : A fake tantrik in Nagpur raped a woman promising to find her missing husband. He lured her with a special ritual, isolated her, and committed the assault. Police arrested the accused in Amravati after the woman filed a complaint.