शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'जास्त वळवळ केली तर कापून काढू..' काँग्रेस उमेदवाराच्या पतीला आ. आशिष देशमुख यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 18:46 IST

Nagpur : गुन्हा दाखल करण्याची अंबादास दानवे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपचे सावनेरचे आ. डॉ. आशिष देशमुख यांनी बुधवारी कळमेश्वर येथील प्रचारसभेत काँग्रेसच्या उमेदवार ज्योत्स्ना मंडपे यांचे पती सरजू मंडपे यांना उघड धमकी दिली. 'सरजू... तुला अर्धा फलकून टाकीन' असे भाषणात जाहीरपणे म्हणत दम भरला. आमदारांच्या या धमकीने कळमेश्वरचे राजकीय वातावरण तापले आहे.

कळमेश्वरमध्ये चार दिवसांपूर्वी आरिफ लतिफ शेख या व्यक्तीला मारहाण झाली. आपण कळमेश्वरमध्ये भाजपचे काम करीत असल्यामुळे आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप शेख यांनी केला. तसा व्हिडीओदेखील जारी केला. यानंतर बुधवारी कळमेश्वरमध्ये झालेल्या भाजपच्या प्रचार सभेत आ. देशमुख यांनी या घटनेचा संदर्भ देत सरजू मंडपे यांना उघड धमकी दिली. हे फडणवीसांचे सरकार आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपूरचे आहेत. सरजा... जास्त वळवळ केली तर तुला फलकून टाकीन, असे आ. देशमुख म्हणाले. विशेष म्हणजे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे यावेळी मंचावर उपस्थित होते. आमदारांच्या या धमकीने कळमेश्वरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या प्रकरणाचे पडसाद राज्यातील राजकीय वर्तुळातही उमटू लागले आहेत. विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आशिष देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भाजप नेत्यांना सत्तेची नशा चढली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकण्यासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना व त्यांच्या जवळच्या व्यक्तींना धमकाविले जात आहे. हे सर्व उघडपणे होत असताना निवडणूक आयोग साधी दखलही घेत नाही व गुन्हा दाखल करत नाही, यावर दानवे यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखnagpurनागपूरsavner-acसावनेरcongressकाँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस