शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

देशाला वाचवायले असेल तर भाजपाला हरवावे लागेल, योगेंद्र यादव यांचे आवाहन

By मंगेश व्यवहारे | Published: October 03, 2023 5:11 PM

२०२४ मध्ये इंडिया आघाडीच पर्याय

नागपूर : २०२४ ची निवडणूक ही सामन्य निवडणूक नाही. लोकशाही, संविधानाला संपविणाऱ्या आणि गणतंत्राचे तुकडे करणाऱ्या भाजप व आरएसएस विरोधातील महत्वाचा लढा आहे. २०२४ च्या निवडणुका हातातून गेल्यास पुढचे २५ वर्ष पर्याय राहणार नाही. भाजप आणि आरएसएसच्या जबड्यातून देशाला वाचवायचे असेल तर भाजपाला हरवावे लागेल, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. योगेंद्र यादव यांनी केले.

लोकशाही आणि संविधान बचाव आंदोलन मंच, आम्ही सारे भारतीय आणि धनवटे नॅशनल कॉलेज मास कम्युनिकेश विभागातर्फे मंगळवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात ‘लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणे प्रत्येक भारतीयांची जबाबदारी’ या विषयांवर आयोजित जाहीर व्याख्यानात योगेंद्र यादव बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय पक्षाच्या इंडिया आघाडीत कितीही वाद असले तरी, तोच एकमेव पर्याय असल्याचे ते म्हणाले.

२०१४ मध्ये सत्तेत आलेल्या भाजप सरकारने लोकशाहीचीच हत्या, संविधानातील समाजवाद, धर्मनिरेपक्षाता, सामाजिक न्याय, एकात्मता संविण्याचे आणि गणतंत्रला तोडण्याचे काम केले आहे. चीन व पाकिस्तानपासून जेवढा धोका या देशाला नाही, तेवढा धोका भाजप व आरएसएसपासून असल्याचे ते म्हणाले. भारत मातेच्या दोन पुत्रांमध्ये दंगे पसरविण्याचे काम आरएसएस करीत आहे. मनिपूरमध्ये सरकारने सिव्हील वार सुरू केला आहे. त्यामुळे लोकतांत्रिक पद्धतीने या सरकारला हटविणे गरजेचे आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत नागपूरकरांनो माणूस बघू नका, देशातील भाजपच्या सत्तेला आणि आरएसएस विचाराला पळविण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी रहा, असे आवाहन त्यांनी केले.

या व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य ओ.एस. देशमुख, यांच्यासह अशोक सरस्वती, अरुण गाडे, प्रा. जावेद पाशा, अरुण लाटकर, अरुण वनकर, श्याम पांढरीपांडे, जम्मू आनंद, सुरेश अग्रवाल, देविदास घोडेस्वार, जगजितसिंग आदी उपस्थित होते.

- नागपूरला देश तोडणाऱ्या विचाराचा प्रतिकार करणारे म्हणून ओळखले पाहिजे

सद्या नागपूरातून एक विचार देशात पसरतोय. पण हा विचार देश तोडणारा आहे. हा विचार नागपूरची ओळख बनू देवू नका, नागपूर तर बहूजन आंदोलनाची भूमी आहे. नवीन उर्जा देणारी, क्रांतीची भूमी आहे. त्यामुळे नागपूरची ओळख देश तोडणाऱ्या विचाराचा प्रतिकार म्हणून झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवBJPभाजपाnagpurनागपूर