शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

शिंकलो तर मोदींना इशारा, हसलो तर अमित शहांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 7:54 AM

मी रा. स्व. संघाचा आवडता आहे, असे माध्यमे म्हणतात. पण पण संघामध्ये असे कुणी आवडते-नावडते नसते. संघटना व देशासाठी काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता संघाचा लाडका असतो, असेही त्यांनी बोलून दाखवले.

गजानन जानभोरनागपूर : मला अजिबात पंतप्रधान व्हायचे नाही. माझे ते स्वप्नही नाही. भिंतीवर पोस्टर चिकटविणाऱ्या कार्यकर्त्याला एवढे मिळाले, ते पुरेसे नाही का? किंबहुना क्षमतेपेक्षा जास्तच मिळाले. त्यामुळे नरेंद्र मोदी हेच पुढचे पंतप्रधान असतील, असे भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतील स्पष्ट केले.

मी रा. स्व. संघाचा आवडता आहे, असे माध्यमे म्हणतात. पण पण संघामध्ये असे कुणी आवडते-नावडते नसते. संघटना व देशासाठी काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता संघाचा लाडका असतो, असेही त्यांनी बोलून दाखवले. तुमच्या विधानांमुळे सतत गोंधळ निर्माण का होतो, या प्रश्नावर गडकरी उत्तरले की, माझ्या विधानांचा पराचा कावळा करण्यात आला. तुम्हाला वेगाने टक्कल पडले आहे’ असे मी म्हटले तरी तुम्ही माझ्या या म्हणण्याचा संदर्भ पंतप्रधान मोदींशी जोडाल. शिंकलो तर मोदींना इशारा, हसलो तर अमित शहांना टोला आणि या शिंकण्या-हसण्याला म्हणे संघाचा आशीर्वाद! मी सहज केलेल्या विधानांचा हा विपर्यास आहे. सध्या प्रसारमाध्यमे आणि विरोधक माझ्या प्रत्येक वक्तव्याकडे भिंग लावून पाहत आहेत. आता मी जे काही बोलणार त्याचा विपर्यास करू नका, नाहीतर आणखी दहा खुलासे करावे लागतील. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींच्या विधानांसंदर्भात सूतावरून स्वर्ग गाठू नका. त्यातून त्या व्यक्तीला मनस्ताप होतो. शिवाय तुमची विश्वासार्हताही धोक्यात येते.

विरोधासाठी विरोध मला जमत नाही. निवडणुका या १५ दिवसांसाठी असतात. त्या संपल्या की द्वेष, टीका मनातून काढायला हव्यात. परवा सोनिया गांधी यांच्यासह विरोधकांनी लोकसभेत माझे अभिनंदन केले. हीच माझ्या कामाची पावती आहे, असे सांगून गडकरी म्हणाले की, एक गोष्ट मी ठरविली आहे, सर्वांनाच मदत करायची आणि वाईट कुणाचेही करायचे नाही. सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी माझ्याकडे येतात. ती कामे लोकांची असतात. त्यांना मदत करुन मी फार मोठे उपकार करत नाही. त्यात राजकारण म्हणून आडकाठ्या आणणे ही शुद्ध बदमाशी आहे. ते मला आयुष्यात जमणार नाही. शिवसेना सतत भाजपावर टीका, आरोप करीत असूनही तुमचा पक्ष युतीसाठी इतका आग्रही का आहे, या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, युती दोघांसाठीही फायद्याची आहे. मने कलुषित करून युती झाली तर कार्यकर्ते मनापासून काम करणार नाहीत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयम बाळगायला हवा. राजकारणात महत्त्वाकांक्षा बाळगली की कितीही मोठी पदे मिळाली तरी माणूनअतृप्तच राहतो. मंत्री म्हणून काम करताना मी लहानसहान गोष्टींत समाधान शोधतो.कटकारस्थान मला जमत नाही. कुणाच्या मागे कुचाळक्या करणे माझ्या स्वभावात नाही. जे आहे ते रोखठोक, स्पष्ट बोलतो. ‘टेक तर टेक नाही तर रामटेक’ असा माझा स्वभाव आहे. नेमक्या याच स्वभावाचे हे दुष्परिणाम मला अलीकडच्या काळात निष्कारण भोगावे लागत आहेत. पण माझा हा मोकळाढाकळा स्वभाव मी सोडणार नाही. तुम्ही कितीही लिहा, टीव्हीवर कसेही दाखवा.- गडकरी

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी