काँग्रेसकडून सन्मान न मिळाल्यास रिपाई स्वबळावर लढणार; दहा जागांचा दिला प्रस्ताव
By आनंद डेकाटे | Updated: December 18, 2025 15:57 IST2025-12-18T15:54:46+5:302025-12-18T15:57:10+5:30
Nagpur : महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) यांच्यावतीने काॅंग्रेसला दहा जागा मागण्यात आल्या आहेत.

If not honoured by Congress, Ripai will contest on his own; Offers 10 seats
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) यांच्यावतीने काॅंग्रेसला दहा जागा मागण्यात आल्या आहेत. काॅँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार आणि काॅंग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांची भेट घेऊन रिपाइंच्या इच्छुक उमेदवारांची यादी सुद्धा सोपवण्यात आली आहे. सकारात्मक चर्चा झाली. परंतु दोन दिवसात निर्णय न झाल्यास रिपाइं स्वबळावर लढेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
रिपाइंचे नागपूर विभागाचे अध्यक्ष प्रकाश कुंभे, शहर कार्याध्यक्ष क्षितीज गायकवाड, शहर महासचिव रजत महेशगवळी, शहर सचिव अश्वजीत गायकवाड, नितेश मेश्राम, सुरेश खोब्रागडे, निखील मेश्राम, मनोज वासनिक आदीनी काॅंग्रेसच्या दोन्ही नेत्यांची भेट घेऊन जागां सदर्भात चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे कुंभे यांनी सांगितले. पुढील दोन दिवसात याबाबत काही निर्णय झाला नाही किंवा सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीतर रिपाइं समविचारी पक्षांसोबत निवडणुकीला सामोरे जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.