पत्नी इस्पितळात दाखल अन् चोरट्यांनी घर फोडले

By योगेश पांडे | Updated: October 19, 2023 15:05 IST2023-10-19T15:04:53+5:302023-10-19T15:05:32+5:30

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

husband was admitted to the hospital and the thieves broke into the house | पत्नी इस्पितळात दाखल अन् चोरट्यांनी घर फोडले

पत्नी इस्पितळात दाखल अन् चोरट्यांनी घर फोडले

नागपूर : पत्नी इस्पितळात दाखल असताना पती तेथे गेले असता चोरट्यांनी घर फोडून साडेपाच लाखांहून अधिकचा ऐवज चोरून नेला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

रोशन कल्लू सिंग (५८, नरेंद्रनगर, विस्तारित मनिषनगर) यांच्या पत्नीची प्रकृती खराब असल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. रोशन हे पत्नीची देखभाल करण्यासाठी इस्पितळात होते. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता ते घराला कुलूप लावून बाहेर पडले व दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आले. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घराच्या कपाटातील सोन्याचांदीचे दागिने तसेच दोन घड्याळे असा ५.७१ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. रोशन सिंग यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: husband was admitted to the hospital and the thieves broke into the house