घरगुती वादातून पत्नीचा खून, पतीचे पोलिसात आत्मसमर्पण; नागपुरातील घटना
By दयानंद पाईकराव | Updated: September 17, 2022 13:04 IST2022-09-17T12:57:27+5:302022-09-17T13:04:54+5:30
पती-पत्नीत नेहमीच भांडण होत होते.

घरगुती वादातून पत्नीचा खून, पतीचे पोलिसात आत्मसमर्पण; नागपुरातील घटना
नागपूर : घरगुती वादातून पत्नीचा खून करून पतीने पोलीस ठाण्यात आत्म समर्पण केले. ही घटना पाचपावली पोलीस ठाणे अंतर्गत लष्करीबाग येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली.
परशुराम ब्राह्मणे रा. लष्करी बाग असे आरोपी पतीचे नाव आहे. तर सोनू परशुराम ब्राह्मणे असे मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी पती परशुराम हा मेयो रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात काम करतो. पती-पत्नीत नेहमीच भांडण होत होते.
रक्तरंजित थरार; नागपुरात विद्यार्थ्याची भर रस्त्यावर हत्या
शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा पती-पत्नीत वाद झाला त्यामुळे संतापलेल्या परशुरामने पत्नीचा खून केला. खून केल्यानंतर परशुरामने थेट पाचपावली पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. पाचपावली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.