नागपुरात हत्यांचे सत्र सुरूच, चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून

By योगेश पांडे | Updated: July 18, 2023 11:42 IST2023-07-18T11:41:55+5:302023-07-18T11:42:38+5:30

नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीला अटक

husband killed his wife in nagpur due to suspicion of character | नागपुरात हत्यांचे सत्र सुरूच, चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून

नागपुरात हत्यांचे सत्र सुरूच, चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून

नागपूर : चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीची हत्या केली. नागपुरातील नंदनवन झोपडपट्टी परिसरात ही घटना घडली. ज्यावेळी हा प्रकार घडला तेव्हा या दांपत्याच्या मुलीदेखील घरीच असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

३८ वर्षीय अर्चना रमेश भारस्कर असे मृतक महिलेचे नाव आहे. ती तिचा आरोपी पती रमेश आणि दोन मुलींसह नंदनवन झोपडपट्टीत राहत होती. रमेशला दारूचे व्यसन आहे आणि तो नशेत अनेकदा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरून त्यांचे अनेकदा वाद देखील झाले होते. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास तो दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने परत पत्नीच्या चारित्र्याचा मुद्दा उकरून काढला. यावरून दोघात वाद झाला संतापाच्या भरात रमेशने हतोड्याने प्रहार करत अर्चनाची हत्या केली. त्यानंतर तो तिथून फरार झाला. या प्रकरणात नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या हत्येचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: husband killed his wife in nagpur due to suspicion of character