शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पतीला आत्महत्येस प्रवृत्त केले

By admin | Updated: December 21, 2015 03:07 IST

नवऱ्याचा मानसिक छळ करून त्याला त्याच्या पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची खळबळजनक घटना लकडगंजमध्ये उघडकीस आली.

आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा : लकडगंजमधील घटना नागपूर : नवऱ्याचा मानसिक छळ करून त्याला त्याच्या पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची खळबळजनक घटना लकडगंजमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुप्रिया ऊर्फ प्रिया अमोल पुप्पलवार (वय २७) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेली ही घटना पाच महिन्यांपूर्वी शांतिनगरमध्ये घडली होती. अमोल गंगाधर पुप्पलवार (वय ३१) याने १२ जुलैच्या सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद केली. चौकशीदरम्यान पोलिसांना अमोलने लिहिलेली सुसाईड नोट आढळली. पत्नीचा छळ असह्य झाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे अमोलने लिहिले होते. त्याने पत्नीच्या छळाचे अनेक किस्से त्याच्या नातेवाईकांनाही सांगितले होते. कायदा महिलांच्या बाजूने असल्यामुळे ती त्याला धमक्याही द्यायची. सततच्या मानसिक छळाला कंटाळून अखेर अमोलने गळफास लावून आत्महत्या केली. त्याची आई सिंधुताई गंगाधर पुप्पलवार (वय ५५) यांनी लकडगंज पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून एपीआय राजूलवार यांनी आरोपी सुप्रियाविरुद्ध नवऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)