नागपुरात भर रस्त्यात तरुणींमध्ये 'दे दणादण'; व्हीडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2022 18:10 IST2022-04-12T17:58:07+5:302022-04-12T18:10:21+5:30

या हाणामारीचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. 

huge fight between girls on the road in nagpur, video goes viral | नागपुरात भर रस्त्यात तरुणींमध्ये 'दे दणादण'; व्हीडिओ व्हायरल

नागपुरात भर रस्त्यात तरुणींमध्ये 'दे दणादण'; व्हीडिओ व्हायरल

नागपूर : शहरात दुपारच्या सुमारास तरुणींमध्ये भररस्त्यात तुंबळ हाणामारी झाली. एकमेकींचे केस ओढण्यापासून तर शिवीगाळ करत चांगलीच झटापट झाली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

ही घटना सिव्हील लाईन परिसरात असलेल्या हिस्लॉप कॉलेजजवळची आहे. दुपारच्या वेळेस रस्त्याकडेला उभा असलेल्या या ६-७ तरुणींमध्ये अचानक भांडण सुरू झाले नंतर त्या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. भर-रस्त्यात या ६-७ तरुणी एकमेकींचे केस ओढत मारहाण करू लागल्या. यावेळी रस्त्यावर गर्दी जमली होती. दरम्यान, कुणीतरी त्याचा व्हीडिओ शूट करून तो सोशल मीडियावर टाकला.

या हाणामारीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. सध्या या घटनेसंदर्भात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, हा व्हीडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. 

Read in English

Web Title: huge fight between girls on the road in nagpur, video goes viral