शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

रामटेकचा गड काँग्रेस कशी करणार सर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 8:18 PM

रामटेक विधानसभेच्या निवडणुकीत रामटेकवर आपला झेंडा रोवण्यासाठी भाजप व शिवसेनेने पुन्हा एकदा आपले अस्त्र ताणले आहेत. तर गड परत काबीज करण्यासाठी काँग्रेसही सज्ज झाली आहे. युतीत तिकीट कुणाच्या कोट्यात जाईल हे स्पष्ट नाही. तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही उमेदवारीचे चित्र अस्पष्ट आहे.

ठळक मुद्देभाजप-सेनेच्या उमेदवाराचे चित्र अस्पष्ट : चालणारा, लढणारा, व जिंकणारा उमेदवार देण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक विधानसभेच्या निवडणुकीत रामटेकवर आपला झेंडा रोवण्यासाठी भाजप व शिवसेनेने पुन्हा एकदा आपले अस्त्र ताणले आहेत. तर गड परत काबीज करण्यासाठी काँग्रेसही सज्ज झाली आहे. युतीत तिकीट कुणाच्या कोट्यात जाईल हे स्पष्ट नाही. तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही उमेदवारीचे चित्र अस्पष्ट आहे. लोकसभेत रामटेकमध्ये भगवा फडकला. त्यामुळे यावेळी काँग्रेसपुढे सर्व बाबींचा विचार करून लढणारा व जिंकणाराच उमेदवार देण्याचे आव्हान असणार आहे.गेल्यावेळी भाजप-सेना युती नव्हती. त्यावेळी भाजपाकडून लढलेले आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी विजयी झाले. शिवसेनेचे माजी आ. आशिष जैस्वाल यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळीही अद्याप युती होणार की नाही हे स्पष्ट नाही. युती झाली तर रामटेकची जागा भाजपला सुटेल की शिवसेनेला, भाजपला गेली तर रेड्डी यांनाच उमेदवारी मिळेल की नवा चेहरा दिला जाईल, हे स्पष्ट नाही. रामटेकची जागा शिवसेनेच्या स्वाभिमानाशी जोडली गेली आहे. त्यामुळे येथे भाजप लढली तर आशिष जयस्वाल यांच्यासह स्थानिक शिवसैनिक नेमकी काय भूमिका घेतील यावरही बरेच काही अवलंबून आहे.युतीत सर्वकाही आलबेल झाले व एकच उमेदवार रिंगणात उतरविला तर मात्र काँग्रेसची अग्निपरीक्षा होईल. काँग्रेसला खूप परिश्रम तर घ्यावेच लागतील पण सोबतच निवडणूक लढणाराच नव्हे तर निवडणूक काढणारा उमेदवार द्यावा लागेल. काँग्रेसच्या उमेदवारावर बराचसा निकाल अवलंबून असेल, असे मतदार उघडपणे बोलून दाखवित आहेत. रामटेकमध्ये काँग्रेसकडून अनेक दावेदार आहेत. पर्यटक मित्र व काँग्रेसच्या राज्य पर्यटन सेलचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून लढलेले डॉ. अमोल देशमुख, जिल्हा सरचिटणीस उदयसिंग यादव, माजी जि.प. सभापती सुरेश कुंभरे, युवक कॉँग्रेसचे सचिन किरपान, हर्षवर्धन निकोसे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक देखील गेल्या काही वर्षांपासून रामटेकच्या कानाकोपऱ्यातील गावात पोहचून काम करीत आहेत. मात्र, सर्वांनी विश्वास दाखविला तरच निवडणूक लढू, अशी सामंजस्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.रामटेकमध्ये काँग्रेसने भाजप- सेनेला तोडीची टक्कर देणारा, लढण्याची क्षमता असलेला, प्रशसकीय अनुभव असलेला व नावापुढे राजकीय वलय असलेला उमेदवार दिला तर रामटेकची निवडणूक रंगात येऊ शकते. रामटेकमध्ये गटबाजीचा फटका काँग्रेसला बसत आला आहे. त्यामुळे सर्वांना घेऊन चालणारा, आपल्या राजकीय उंचीचा वापर करून सर्वांना न्याय मिळवून देण्याची क्षमता असलेला व जनतेला आश्वासक व आपलासा वाटणारा उमेदवार दिला तर काँग्रेस येथे चांगली लढत देऊ शकते. अन्यथ रामटेकची निवडणूक काँग्रेससाठी फक्त खानापूर्ती ठरेल.

 

टॅग्स :congressकाँग्रेसramtek-acरामटेकElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा