शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असताना नायलाॅन मांजा विकला जाताेच कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST

नागपूर : राष्ट्रीय हरीत लवादाकडून (एनजीटी) दाेन वर्षांपासून नायलाॅन मांजाच्या खरेदी आणि विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. असे ...

नागपूर : राष्ट्रीय हरीत लवादाकडून (एनजीटी) दाेन वर्षांपासून नायलाॅन मांजाच्या खरेदी आणि विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. असे असताना या जीवघेण्या मांजाची सर्रासपणे खरेदी - विक्री हाेतेच कशी, असे खडेबाेल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासन व इतर संस्थांना सुनावले. नायलाॅन मांजावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने आतापर्यंत काेणते पाऊल उचलले आहेत, असा थेट सवाल करीत सरकार व स्थानिक संस्थांना नाेटीस बजावली आहे. सरकारने दाेन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पतंगबाजीसाठी माेठ्या प्रमाणात नायलाॅन मांजाचा वापर हाेत असल्याने जीवघेण्या दुर्घटना घडत आहेत. नागपूरच्या इमामवाडा परिसरात २१ वर्षीय प्रणय प्रकाश ठाकरे या तरुणाचा नायलाॅन मांजामुळे गळा चिरल्याने नुकताच मृत्यू झाला. यानंतर काहीच वेळात मानेवाडा भागात साैरभ पाटणकर हा २२ वर्षीय तरुण या मांजामुळे गंभीर जखमी झाला. डिसेंबर महिन्यात अशाच प्रकारे एका शाळकरी मुलाला मांजामुळे गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. केवळ माणसेच नाहीत तर पशु-पक्ष्यांनाही मारक ठरला असून, दरवर्षी शेकडाे पक्षी मांजात अडकून जीव गमावतात. याबाबत गंभीर दखल घेत राज्यात नायलाॅन मांजावर प्रतिबंधही लावण्यात आले. मात्र, अंमलबजावणीअभावी मांजाची खुलेआम विक्री आणि खरेदी हाेत आहे. यावर न्यायालयाने स्वत: सू-माेटाे जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी करताना न्यायालयाने राज्य शासन आणि महापालिकांसारख्या संस्थांना धारेवर धरले. प्रतिबंध असताना नायलाॅन मांजाची सर्रासपणे विक्री हाेतेच कशी, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. सरकारने प्रतिबंध कायम राहण्यासाठी काय उपाययाेजना केल्या, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. या प्रकरणात ॲड. देवेन चाैहान यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.