शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सर्वांसाठी घरे योजना; उद्दिष्ट १० हजारांचे; वाटप मात्र ९५ घरांचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 13:16 IST

Housing scheme, Nagpur newsआर्थिक दुर्बल घटकांसाठी नासुप्रतर्फे ४३४५ घरे उभारली आहेत. परंतु यातील फक्त ९५ लोकांना घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतांत्रिक कारणामुळे वाटपाला विलंबनासुप्रने ४३४५ घरे उभारली 

गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वांसाठी २०२२ पर्यंत घरे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना जून २०१५ मध्ये सुरू करण्यात आली. नागपूर शहरासाठी १० हजार घरकुलांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यात महापालिकेतर्फे १११४, म्हाडा ५५७ व नासुप्र ४३४५ घरकुलांचे काम करीत आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी नासुप्रतर्फे ४३४५ घरे उभारली आहेत. परंतु यातील फक्त ९५ लोकांना घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी असल्याने वाटप रखडले आहे.नासुप्रतर्फे मौजा वाठोडा येथे २६४, मौजा तरोडी २३७४, मौजा वांजरी ७६५, मौजा तरोडी खूर्द येथे ९४२ अशा प्रकारे एकूण ४३४५ घरांचे बांधकाम केले आहे. यातील वाठोडा येथील ९५ घरांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित घरे बांधून तयार असून ती वाटपाच्या कार्यवाहीत असल्याची माहिती नासुप्रने युवा संस्थेचे नितीन मेश्राम यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे.वांजरी येथील ७६५ घरांचे बांधकाम झाले आहे. परंतु पाण्याची लाईन टाकावयाची आहे. महापालिकेकडे हे काम देण्यात आले आहे. परंतु सहा महिन्यापासून काम रखडले आहे. अशीच परिस्थिती तरोडी येथील २३७४ घरकुलांची आहे. मनपा पाणी पुरवठा करणार आहे. जलकुंभाचे काम रखडले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणी घेताना दराबाबत वाटाघाटी सुरू होत्या. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून वीज पुरवठ्याला विलंब होत असल्याची माहिती आहे.क्षमता नसलेल्या भागात घरांचे बुकींगनासुप्रतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेतील घरकुलांच्या किमती वेगवेगळया आहेत. दुर्बल घटकातील नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज करताना अधिक रकमेच्या घरकुलांसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे परतफेड करण्याची क्षमता नसल्याने बँकाकडून कर्ज मिळण्याला अडचणी येत आहेत. तसेच अनेक अर्जधारक आधीच थकबाकीदार आहेत. यामुळेही घरकुल वाटपात अडचणी येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.लाभार्थीकडून हप्ते न घेता बांधकामघरकुलांचे बांधकाम करताना लाभार्थींनी तीन टप्प्यात घरकुलांची रक्कम जमा करणे अपेक्षित आहे. यात घरांचे बांधमाला सुरूवात करताना, स्लॅब टाकताना व घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पैसे जमा करणे अपेक्षित आहे. मात्र दुर्बल घटकांतील लाभार्थीकडून ही रक्कम आधीच घेतली असती तर घरकुलाचा ताबा मिळण्यापूर्वीच त्यांना बँकेच्या कजार्चे हप्ते भरावे लागले असते. याचा विचार करता नासुप्रने याची प्रतीक्षा न करता बांधकाम केले आहे.

टॅग्स :Homeघर