मस्कासाथ मध्ये घराला आग, ७ लाखाचे नुकसान

By मंगेश व्यवहारे | Updated: February 17, 2024 23:37 IST2024-02-17T23:36:48+5:302024-02-17T23:37:04+5:30

या घराचे मालक महेश रामदास गोनाडे असून त्याच्या घरातील 2 फ्रिज, 3 कपाट, 3 दिवाण, १ टिव्ही व 10 हजार रुपये रोख आगीत जळून खाक झाले आहे.

House fire in Maskasath, loss of 7 lakhs | मस्कासाथ मध्ये घराला आग, ७ लाखाचे नुकसान

मस्कासाथ मध्ये घराला आग, ७ लाखाचे नुकसान

नागपूर : मस्कासाथ संभाजी रोड नागोबा मंदिर रेल्वे लाईनचा बाजूला असलेल्या एका घराला शनिवारी सायंकाळी ६.४८ वाजताच्या सुमारास आग लागली. याआगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून सात लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. 

या घराचे मालक महेश रामदास गोनाडे असून त्याच्या घरातील 2 फ्रिज, 3 कपाट, 3 दिवाण, १ टिव्ही व 10 हजार रुपये रोख आगीत जळून खाक झाले आहे. आग शॉर्टसर्किट ने लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन विभागाला या संदर्भात माहिती मिळताच, गंजीपेठ व लकडगंज केंद्रातून दोन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. यानंतर १० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले होते.

Web Title: House fire in Maskasath, loss of 7 lakhs