बोरकुटे लेआऊटमध्ये घराला आग
By मंगेश व्यवहारे | Updated: April 24, 2024 12:58 IST2024-04-24T12:56:50+5:302024-04-24T12:58:38+5:30
Nagpur : आगीमध्ये ८० हजार रुपये किंमतीच्या साहित्याचे नुकसान

House fire in Borkute Layout
नागपूर : नरेंद्रनगर परिसरातील बोरकुटे लेआऊट येथे राहणारे लक्ष्मीकांत पोच्छी यांच्या घरात पहाटे ४ वाजता आग लागली. आगीची कॉल येताच नरेंद्रनगर फायर स्टेशनमधून अग्निशमनची गाडी तत्काळ घटनास्थळावर पोहचली. आग घरातील मोर्चमध्ये असलेल्या मीटरला लागली होती.
आगीमध्ये महावितरणचे मीटर, सोलर मीटर, दोन दुचाकी, दोन कारचे नुकसान झाल्याची माहिती आहे. अग्नीशमन विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार इलेक्ट्रीक मीटरला आग लागल्याचे निष्पन्न झाले असून, ८० हजार रुपये किंमतीच्या साहित्याचे नुकसान झाले असून, अंदाजे २ कोटी रुपयांच्या साहित्याची बचत झाल्याची नोंद अग्निशमन विभागाने केली आहे. घटनास्थळी बेलतरोडी पोलीस स्टेशनमधून कर्मचारीही पोहचले होते. सकाळी ६ वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले होते.