घरची मंडळी निद्रिस्त अन्‌ चोरटे घरात सक्रिय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:46 IST2021-06-02T00:45:21+5:302021-06-02T00:46:47+5:30

Theft, crime news घरची मंडळी गाढ झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरातून चार लाखांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांसह नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

The house church is active in the sleepless and thieving house! | घरची मंडळी निद्रिस्त अन्‌ चोरटे घरात सक्रिय !

घरची मंडळी निद्रिस्त अन्‌ चोरटे घरात सक्रिय !

ठळक मुद्देहुडकेश्वरमध्ये धाडसी चोरी : ९ लाखाचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरची मंडळी गाढ झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरातून चार लाखांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांसह नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

हुडकेश्वर खुर्द परिसरात शितलामाता मंदिराजवळ कृपाशंकर मितलाल शाहू (वय ३६) राहतात. एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये कृपाशंकर यांचे तीन भाऊ त्यांच्या परिवारासह राहतात. ते पशुआहार आणि किराणा व्यावसायिक आहेत. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केल्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि आपापल्या खोल्यांमध्ये झोपी गेले. मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास कुटुंबातील महिला जाग्या झाल्या, तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी शयनकक्षात कपाटात ठेवलेली चार लाखाची रोकड, तसेच सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा एकूण ९ लाख १० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

या घटनेचे वृत्त परिसरात कळताच एकच खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत.

Web Title: The house church is active in the sleepless and thieving house!