शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

हॉटस्पाॅट परिसर सील करणार : मनपा प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 12:46 AM

Hotspot premises to be sealed केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या हॉटस्पॉट भागाला कंटेनमेन्ट झोन घोषित करून हा परिसर सील केला जाणार आहे.

ठळक मुद्देआठवड्यात मृत्यू दुपटीने वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची सर्वात मोठी समस्या असल्याने महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांचा मुक्त संचार असल्याने संक्रमणाचा धोका वाढला आहे. याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या हॉटस्पॉट भागाला कंटेनमेन्ट झोन घोषित करून हा परिसर सील केला जाणार आहे.

कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी कोरोना चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, विलगीकरण व उपचार होणे आवश्यक आहे. सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची मोठी समस्या आहे. बाधिताच्या संपर्कात आलेले अनेक जण कोरोना चाचणी करीत नाही. अशा लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठी आहे. असे रुग्ण सर्वत्र वावरत असल्याने संक्रमण वाढत आहे.

महापालिकेच्या लक्ष्मीनगर, हनुमान नगर व मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या भागातील हॉटस्पॉट निश्चित करून कंटेनमेन्ट झोन जाहीर करून परिसर सील केला जाणार असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली. सध्या नागपूर शहरात २७ हजार ८६६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील २३ हजार ८०० होम आयसोलेशनमध्ये तर ३७४१ रुग्णांलयात उपचार घेत आहेत.

एका आठवड्यात मृत्यू दुप्पट

१५ ते २१ मार्च २०२० या कालावधीत नागपूर शहरात २२ हजार ५७८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले, तर या कालावधीत १६५ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र २१ ते २८ मार्च दरम्यान २५ हजार ७४० पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३०७ रुग्णांचा मृत्यू झाला. आठवडाभरात मृत्यूचा आकडा दुप्पट झाला आहे. ही चिंतेची बाब आहे.

आधीच्या लाटेच्या तुलनेत परिस्थिती गंभीर

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले होते. १३ सप्टेंबरला बाधितांचा आकडा २३४३ पर्यंत पोहोचला होता. परंतु दुसऱ्या लाटेत हा आकडा कधीच पार केला आहे. १ मार्चपासून बाधितांचा आकडा दररोज वाढत असून तो ३५०० ते ४००० वर गेला आहे. आधीच्या लाटेच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र असून चिंता वाढविणारी आहे.

१ मार्च ते २८ मार्च दरम्यान झालेली रुग्णवाढ

 

आठवडा - चाचण्या -   पॉझिटिव्ह - मृत्यू

१ ते ७ मार्च  -६३८७५    -  ७१९४  - ५५

८ ते १४ मार्च- ६८५७२ -१२७७३ -६९

१५ ते २१ मार्च -१,०२८०४ -२२५७८ -१६५

२१ ते २८ मार्च - १,११,११३ - २५७४० -३०७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका