शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

हनीसिंग व्हाईस रेकॉर्डिंगसाठी नागपुरात येणार

By admin | Updated: February 19, 2015 02:06 IST

अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेले पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंग व आदित्य पी.पी. सिंग ऊर्फ बादशाह यांना..

नागपूर : अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेले पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंग व आदित्य पी.पी. सिंग ऊर्फ बादशाह यांना व्हाईस रेकॉर्डिंगसाठी २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी बुधवारी दिले. या अटीवर दोघांनाही त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणीच्या तारखेला सत्र न्यायालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळाली आहे.व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व बादशाहविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दोघांनीही सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. सत्र न्यायालयाच्या आदेशामुळे दोघांनीही पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित राहून बयान नोंदविले. यानंतर, पोलिसांनी प्रतिज्ञापत्रावर दोघेही चौकशीला योग्य सहकार्य करीत नसल्याची माहिती देऊन अटकपूर्व जामीन अर्जांवर दोघांच्या उपस्थितीतच अंतिम सुनावणी घेण्याची विनंती केली होती. परिणामी २९ जानेवारी रोजी सत्र न्यायालयाने दोघांनाही अर्जांवरील अंतिम सुनावणीला व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयात दोघांनीही पोलिसांना आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने त्यांना २ मार्च रोजी व त्यानंतरही तपास अधिकाऱ्याला आवश्यक तेव्हा पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याचे निर्देश देऊन सत्र न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द केला.पोलिसांनी कायद्यानुसार व्हाईस रेकॉर्डिंग घ्यावे असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हनीसिंग व बादशाहच्या अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत आहे. समाजात असंस्कृत वातावरण निर्माण होत आहे. त्याला अश्लील गाणी गाण्यापासून थांबविण्यात यावे असे तक्रारकर्ते जब्बल यांचे म्हणणे आहे. हनीसिंगतर्फे अ‍ॅड. अतुल पांडे, बादशाहतर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास तर, शासनातर्फे एपीपी संदीप भागडे व मुकुंद एकरे यांनी बाजू मांडली. फौजदारी सहायक अविनाश अक्केवार यांनी पोलिसांना सहकार्य केले.गप्प राहणे चुकीचे इंटरनेटवर अपलोड करण्यात आलेली अश्लील गाणी पायरेटेड असल्याचे हनीसिंग व बादशाहचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार वादग्रस्त गाणी दुसऱ्याने त्यांच्या आवाजात गायिली आहेत. परंतु, यासंदर्भात त्यांनी अद्यापही कोणावरच खटला दाखल केलेला नाही. यासंदर्भात न्यायालयाने खंत व्यक्त केली. कधी-कधी गप्प राहिल्यामुळे खोटेही सत्य वाटायला लागते असे मत न्यायालयाने व्यक्त केले.रिट याचिकेवरील सुनावणी तहकूबहनीसिंग व बादशाहविरुद्ध उच्च न्यायालयात प्रलंबित जब्बल यांच्या फौजदारी रिट याचिकेवरील सुनावणी बुधवारी पोलिसांनी कारवाईचा अहवाल सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मागितल्यामुळे तहकूब करण्यात आली. पोलिसांनी हायकोर्टाच्या दणक्यानंतर दोघांविरुद्ध एफआयआर नोंदविला होता. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.