घर जवळ आले होते; पण.. ६ वऱ्हाडींवर काळाची झडप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 06:37 IST2023-12-17T06:37:07+5:302023-12-17T06:37:18+5:30

नागपूर - काटोल महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री १२:३० नंतर  भरधाव ट्रकने क्वाॅलिस गाडीला धडक दिल्याने सहाजणांचा दुर्दैवी अंत झाला

Home was near; But.. 6 people died in Accident nagpur katol road | घर जवळ आले होते; पण.. ६ वऱ्हाडींवर काळाची झडप

घर जवळ आले होते; पण.. ६ वऱ्हाडींवर काळाची झडप

लोकमत न्यूज नेटवर्क
काटोल (जि. नागपूर) : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून नागपूरहून गावी परतणाऱ्या सहा वऱ्हाडींवर काळाने झडप घातली. नागपूर - काटोल महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री १२:३० नंतर  भरधाव ट्रकने क्वाॅलिस गाडीला धडक दिल्याने सहाजणांचा दुर्दैवी अंत झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मयूर इंगळे (२५, चालक), सुधाकर मानकर (४०), विठ्ठल थोटे (४०), रमेश हेलोंडे (५०),  वैभव चिखले (३२), अजय चिखले (४०) अशी मृतांची, तर जगदीश ढोणे (३९, सर्व रा. मेंढेपठार, ता. काटोल) असे जखमीचे नाव आहे.

माजी झेडपी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ होता. चिखले कुटुंबाचे काही आप्तेष्ट कार्यक्रमासाठी गेले होते. गाव अवघे ६ किमी दूर असताना सोयाबीनने भरलेल्या ट्रकने कॉलिसला समोरून जोरदार धडक दिली. 

Web Title: Home was near; But.. 6 people died in Accident nagpur katol road

टॅग्स :Accidentअपघात