शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बीअर, व्हिस्कीची घरून विक्री  : बारमालकासह दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 20:42 IST

बीअर, रमसह विलायती मद्याची घरून विक्री करणाऱ्या गोधनीतील एका बार मालकाला आणि त्याच्या मेव्हण्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून बिअर, रम आणि व्हिस्कीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बीअर, रमसह विलायती मद्याची घरून विक्री करणाऱ्या गोधनीतील एका बार मालकाला आणि त्याच्या मेव्हण्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून बिअर, रम आणि व्हिस्कीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. रविवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.ईश्वर गोपाळराव कोलते (वय ६३, रा. गोधनी मार्ग, मानकापूर) आणि नीरज यशवंत कापसे (वय ३८) अशी आरोपींची नावे आहेत. ईश्वर कोलतेचा मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राधे बीअर बार आहे. लॉकडाऊनमुळे सध्या सर्व बीयर बार, वाईन शॉपला टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे बिअर बारच्या संचालकांनी आपल्या साथीदारांना हाताशी धरून बारमधील दारू बाहेर काढून ती पाच ते सात पट जास्त दराने विकणे सुरू केले आहे. नागपुरातील मेयो चौकातील मदिरा बीअर बार आणि हुडकेश्वर मधील एस. के. बीअर बार मालकांची ही बनवेगिरी उघड झाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापे घालून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त केला आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. अशाच प्रकारे मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राधे बीअर बारचा मालक ईश्वर कोलते आणि त्याचा मेहुणा नीरज कापसे हे दोघे त्यांच्या गोधनी मार्गावरील घरातून मद्याची अवैध विक्री करत असल्याचे गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कळले. त्यानुसार रविवारी रात्री ९ च्या सुमारास त्यांनी कोलतेच्या घरी छापा मारला. पोलिसांनी तेथून बकार्डी ब्लॅक रम, टूबर्ग बियर, इंपिरियल ब्लू तसेच रॉयल चॅलेंज विस्कीच्या बाटल्या जप्त केल्या. आरोपी कोलते आणि कापसे या दोघांना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेचे अतिरिक्­त पोलिस आयुक्­त निलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहायक निरीक्षक प्रशांत घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :liquor banदारूबंदीraidधाड