नागपुरात 'कोरोना'च्या दहशतीत पेटली 'होळी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 21:44 IST2020-03-09T21:39:03+5:302020-03-09T21:44:30+5:30
भारतीय संस्कृतीचे अतिशय प्राचीन परंपरा असलेले होलिका दहन ठिकठिकाणी करण्यात आले. पोलीस डायरीच्या नोंदीनुसार शहरातील ५८० जागांवर सामूहिक होळी पेटविण्यात आली.

नागपुरात 'कोरोना'च्या दहशतीत पेटली 'होळी'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संस्कृतीचे अतिशय प्राचीन परंपरा असलेले होलिका दहन ठिकठिकाणी करण्यात आले. पोलीस डायरीच्या नोंदीनुसार शहरातील ५८० जागांवर सामूहिक होळी पेटविण्यात आली. यावेळी सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरपासून मुक्ती देण्याची प्रार्थना भाविक नागरिकांनी होलिका देवतेकडे केली.
शरद ऋतूमधील कोरडा गारवा सोडून वसंत ऋतूतील प्रसन्न वातावरणाकडे जाणारी ऋतूसंधी म्हणजे होळी हा सण होय. फाल्गुन पौर्णिमेला पेटविल्या जाणाऱ्या होळीला वाईट वृत्तीवर सत्याचा विजय अशा संदर्भानेदेखील बघितले जाते. त्या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी सामूहिक होलिका दहन आणि पूजनाचे कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी आटोपले.