शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

"देशाचे पंतप्रधान कसे होता होईल यातच रस" सपकाळ फडणवीसांवर बरसले, कुचकामी गृहमंत्री असल्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:02 IST

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुचकामी गृहमंत्री ठरले आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात संतप्त घटना घडत आहेत. फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी खोक्या, आका, कोयता गँग यांसारखे शब्द दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुचकामी गृहमंत्री ठरले आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात संतप्त घटना घडत आहेत. फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी खोक्या, आका, कोयता गँग यांसारखे शब्द दिले. याला पूर्णपणे फडणवीस जबाबदार आहेत. महाराष्ट्राला किमान पूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा. त्यांना स्वतःला गडचिरोलीच्या खाणी कोणाला वितरित करायच्या आणि देशाचे पंतप्रधान कसे होता होईल यातच रस असून, त्यासाठी खटाटोप सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. सोमवारी पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, निवडणूक आयोग मतचोरी करतोय, राहुल गांधी यांनी देशभरात कॅम्पेन सुरू केल्यानंतर त्याचे विविध पुरावे सादर केलेले आहेत. 'गली गली मे चोर है, चुनाव आयोग चोर है,' हे लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचले आहे. त्यामुळे भाजप घाबरली आहे, असे सपकाळ म्हणाले.

मोहोळ यांचा राजीनामा घ्या

जैन बोर्डिंगचा व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही, साडेतीन एकर जमीन गिळंकृत करणारे मुरलीधर मोहोळ होते. त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. आज नाही तर उद्या हा व्यवहार रद्द झालाच असता. आता मोहोळ यांना वाचविण्याकरिता हा करार रद्द करण्याचा खटाटोप चालला आहे, असेही सपकाळ म्हणाले.

बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा

बच्चू कडू यापूर्वी उपोषणाला बसले होते. सरकारने त्यांच्या सर्व मागण्या आणि प्रश्न ताबडतोब सोडविले पाहिजे, अशी भूमिका आम्ही जाहीर केली आहे. बच्चू कडू यांनी आपल्यालाही पाठिंब्यासाठी पत्र पाठविले आहे. काँग्रेसचा त्यांना पाठिंबा आहे, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

शेतकरी पॅकेजमध्ये लिकेज

पॅकेजमधून शेतकऱ्यांना काही मिळणार नाही. या पॅकेजमध्ये अनेक लिकेजेस आहेत. मुख्यमंत्र्यांनी कुठलीही कमाल मर्यादा न ठेवता हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sapkale slams Fadnavis, calling him an incompetent Home Minister.

Web Summary : H. Sapkale criticized Fadnavis, deeming him an inept Home Minister responsible for Maharashtra's issues. He accused Fadnavis of prioritizing personal ambitions over governance, demanding a full-time Home Minister and supporting farmers' demands for debt relief and compensation.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरHome Ministryगृह मंत्रालयMaharashtraमहाराष्ट्रprime ministerपंतप्रधान