नागपुरातील ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीने वाढवली धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:12 AM2020-06-13T00:12:03+5:302020-06-13T00:15:39+5:30

कोविड-१९ च्या संकटामुळे सध्या लॉकडाऊन सुरु आहे. परंतु या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करीत सिव्हील लाईन्स येथे आयोजित एका हायप्रोफाईल पार्टीने प्रशासनाची झोप उडाली आहे. या पार्टीत सहभागी असलेली एक युवती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जाते. या पार्टीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची प्रशासनाला भीती आहे.

The 'that' high profile party in Nagpur raised fears | नागपुरातील ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीने वाढवली धास्ती

नागपुरातील ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीने वाढवली धास्ती

Next
ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीतीपोलीस-प्रशासनाने सुरु केला तपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ च्या संकटामुळे सध्या लॉकडाऊन सुरु आहे. परंतु या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करीत सिव्हील लाईन्स येथे आयोजित एका हायप्रोफाईल पार्टीने प्रशासनाची झोप उडाली आहे. या पार्टीत सहभागी असलेली एक युवती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जाते. या पार्टीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची प्रशासनाला भीती आहे.
सूत्रानुसार मागच्या आठवड्यात शहरातील एका उद्योजकाच्या पत्नीचा वाढदिवस होता. उद्योजकाच्या पत्नीने सीताबर्डी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सिव्हील लाईन्स येथील एका लाऊंजमध्ये ‘सॅटरडे नाईट पार्टी’ आयोजित केली होती. या पार्टीत शहरातील अनेक नामवंत परिवारातील लोक सहभागी झाले होते. या पार्टीत ७० ते ८० लोक सहभागी झाल्याचे सांगितले जाते. याच पार्टीत शहरातील एका रेस्टॉरंट व्यावसायिकाचा मुलगा आणि मुलगी सहभागी झाले होते. या व्यावसायिकाची मुलगी विदेशात राहते. विमान सेवा सुरु झाल्यानंतर ती काही दिवसापूर्वी दिल्लीवरून नागपूरला आली आहे. तिला ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. असे सांगितले जाते की, सर्दी-खोकला आणि ताप असुनही ती पार्टीत सहभागी झाली होती. रात्री उशिरा ही पार्टी संपली. पार्टीत सहभागी असलेले काही लोक अंबाझरी पोलीस ठाणे परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये आले. तिथे पुन्हा तीन परिवारातील सदस्यांनी ‘आफ्टर पार्टी’ठेवली होती. या परिवारातील सदस्य आणि पाच सहा जोडप्यांसह ४० ते ५० लोक या पार्टीत सहभागी होते. रविवारी पहाटेपर्यंत ही पार्टी चालली. अशी चर्चा आहे की, रविवारी या मुलीची प्रकृती आणखी खराब झाली. यानंतर तिची कोविड-१९ ची टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. तेव्हापासून या दोन्ही पार्टीचे आयोजक आणि त्यात सहभागी लोकांमध्ये खळबळ माजली आहे. बहुतांश लोक स्वत:च होम क्वारंटाईन झाले आहेत. मनपा प्रशासनाने एमएलए होस्टेल परिसरातील त्या हायप्रोफाईल बिल्डिंगला सील केले आहे, जिथे शिवाजीनगर येथील हॉटेल व्यावसायिक राहतो. दोन्ही पार्टीत उच्च शिक्षित आणि जबाबदार लोक सहभागी झाले होते.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक आयोजनावर बंदी घातली आहे. यानंतरही दोन-दोन ठिकाणी पार्टी आयोजित करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी सुद्धा मनपाने नाईक तलाव येथे पार्टी आयोजित केल्याने कोरोना संसर्ग झाल्याचा दावा केला होता. परंतु पोलीस तपासात ही बाब चुकीची आढळून आली. मात्र सिव्हील लाईन्स येथील घटना ही आणखीनच गंभीर आहे. पोलीस आणि प्रशासन यावर बोलायला तयार नाहीत. सीताबार्डीचे ठाणेदार जगवेंद्र सिंग राजपूत आणि मनपाचे अप्पर आयुक्त राम जोशी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

घटना दडवण्याचा प्रयत्न
असे सांगितले जाते की, पार्टीत सहभागी लोक खरी माहिती सांगितल्यावर क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्याच्या भीतीने चिंतेत आहे. त्यांना माहीत आहे की, खरा प्रकार सांगितला तर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. याशिवाय त्यांना विचारपूस करण्यासाठीही वारंवार चकरा माराव्या लागतील. त्यामुळे ते पार्टी आयोजित केल्याची बाब स्पष्टपणे नाकारत आहेत.

सोशल मीडियावर ‘वॉर’
या घटनेनंतर पार्टी आयोजक आणि विरोधक यांच्यात सोशल मीडियावर युद्ध छेडले आहे. पार्टीचे आयोजन करणाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना या प्रकरणात विनाकारण बदनाम केले जात आहे. आरोप-प्रत्यारोपानंतर हा वाद पोलीस ठाण्यातही पोहोचला आहे. एका हॉटेल संचालकाने त्यांच्या हॉटेलचे नाव या वादाशी जोडल्याबद्दल सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कुठलीही पार्टी झाली नाही
दरम्यान संसर्गित हायप्रोफाईल युवतीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकलेल्या एका पोस्टमध्ये पार्टीच्या आयोजनाचे वृत्त फेटाळून लावले आहे. तिने लिहिले आहे की, गेल्या आठवड्यात तिच्या घरी कुठलीही पार्टी झाली नाही. कुठलाही आधार नसताना याप्रकारचे वृत्त पसरविले जात आहे.

Web Title: The 'that' high profile party in Nagpur raised fears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.