शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हायकोर्ट : वैद्यकीय प्रवेशावर राज्य सरकारला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:14 PM

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता अपात्र ठरलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव, महाराष्ट्र सीईटी सेल आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांना नोटीस बजावली. याचिकेवर अवकाशकालीन न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

ठळक मुद्देदोन अपात्र विद्यार्थ्यांची याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता अपात्र ठरलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव, महाराष्ट्र सीईटी सेल आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांना नोटीस बजावली. याचिकेवर अवकाशकालीन न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली.डॉ. सुमित जग्यासी व डॉ. वरुण कोमबत्तुला, अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांनी नीट परीक्षा उत्तीर्ण करून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज सादर केले होते. त्यांना दुसऱ्या फेरीत जागा वाटप करून ३ मेपर्यंत संबंधित महाविद्यालयात उपस्थिती नोंदविण्यास सांगण्यात आले. दरम्यान, उच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय (एसईबीसी) आरक्षण अवैध ठरविल्यामुळे याचिकाकर्त्यांनी संबंधित महाविद्यालयात उपस्थिती नोंदविणे टाळले. त्यानंतर राज्य सरकारने वटहुकूम जारी करून सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय(एसईबीसी)मधील प्रवेश कायम केले. परिणामी, सीईटी सेलने ३ मेपर्यंत महाविद्यालयात उपस्थिती नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचेच प्रवेश कायम केले. याचिकाकर्त्यांनी महाविद्यालयात उपस्थिती नोंदविली नसल्यामुळे त्यांना पुढील प्रवेश फेरीसाठी अपात्र ठरविण्यात आले. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रकरणातील सर्व प्रतिवादींना यावर गुरुवारी उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्याम देवानी व अ‍ॅड. दीपेन जग्यासी तर, सरकारतर्फे अ‍ॅड. निवेदिता मेहता यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थी