शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट वकील परिसराचा होतोय ‘मेकओव्हर’

By admin | Updated: June 5, 2017 02:06 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकील परिसराचा पूर्णपणे ‘मेकओव्हर’ करण्यात आला आहे.

आकर्षक नूतनीकरण : नवीन कार्यकारिणीची दमदार सुरुवातलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकील परिसराचा पूर्णपणे ‘मेकओव्हर’ करण्यात आला आहे. आकर्षक नूतनीकरणामुळे परिसराला ‘कॉर्पोरेट लूक’ प्राप्त झाला आहे. आपण आधी पाहत होतो, तो परिसर हाच का? असा प्रश्न येथे येणाऱ्याला पडत आहे.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या नवीन कार्यकारिणीने अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वात या कामांद्वारे आपल्या कार्यकाळाची दमदार सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाच्या जुन्या इमारतीमधील एका भागात खासगी व सरकारी वकिलांना बसण्यासाठी खोल्या, संघटनेचे उपाहारगृह, ग्रंथालय, टंकलेखक, स्टॅम्प विक्रेते, झेरॉक्स, स्टेशनरी इत्यादी बाबी आहेत. संघटनेने तळमाळ्यातील परिसराचे देखणे नूतनीकरण केले आहे. छताला पीओपी करून लाईटस् लावण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वारापुढील परिसराला विशेष सजविण्यात आले आहे. राज्यघटनेतील प्रस्तावना कोरलेली शिला या परिसरात बसविण्यात आली आहे. उपाहारगृहाचाही चेहरामोहरा बदलविण्यात आला आहे. पक्षकारांसाठी प्रतीक्षालय व माहिती कक्ष तयार करण्यात आले आहे. अ‍ॅड. किलोर यांनी यासंदर्भात बोलताना ही केवळ सुरुवात असल्याचे सांगितले. न्यायालय, वकील व पक्षकारांच्या सुविधांच्या बाबतीत संघटनेकडे आणखी अनेक योजना असून त्यावर येत्या काळात तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. उत्साहाच्या वातावरणात उद्घाटनराज्यघटनेतील प्रस्तावना कोरलेल्या शिलेचे न्यायमूर्ती भूषण गवई, प्रवेशद्वारापुढील परिसराचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी तर, उपाहारगृहाचे न्यायमूर्ती वासंती नाईक यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला. याप्रसंगी प्रामुख्याने न्या. प्रसन्न वराळे, न्या. रवी देशपांडे, न्या. झेड. ए. हक, न्या. अतुल चांदूरकर, न्या. इंदिरा जैन, न्या. स्वप्ना जोशी, सहायक सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर उपस्थित होते.वकिलांना जाण्यायेण्यासाठी व्हॅनअनेक वकिलांना प्रकरणांवरील सुनावणीसाठी उच्च न्यायालयातून जिल्हा न्यायालयात व जिल्हा न्यायालयातून उच्च न्यायालयात जावे लागते. अशा वकिलांच्या सुविधेसाठी अ‍ॅड. अतुल पांडे यांनी आजोबा केशवराव पांडे (तिरोडा) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संघटनेला व्हॅन भेट दिली. या व्हॅनमधून वकिलांना उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयात नि:शुल्क जाणेयेणे करता येईल. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते व्हॅन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. अ‍ॅड. अतुल पांडे यांचे वडील पद्माकर व आई नीलिमा यांनी व्हॅनच्या चाव्या संघटनेच्या सुपूर्द केल्या.