शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळावर हाय अलर्ट घोषित ! रेडफोर्ट बॉम्बस्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:25 IST

Nagpur : अधिक तपासणी आणि सुरक्षा तपशीलामुळे चेकइन आणि बोर्डिंग प्रक्रियेस अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना उड्डाणाच्या नियोजित वेळेच्या किमान दोन तास आधी पोहोचण्याचा सल्ला दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीत सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरात जारी करण्यात आलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा पूर्णतः सतर्क असून गस्त, तपासणी आणि श्वान पथकांच्या हालचालींना अधिक गती देण्यात आली आहे.

प्रवाशांसाठी विशेष सूचना

अधिक तपासणी आणि सुरक्षा तपशीलामुळे चेकइन आणि बोर्डिंग प्रक्रियेस अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना उड्डाणाच्या नियोजित वेळेच्या किमान दोन तास आधी पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, बॅगेज आणि ओळखपत्र तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सीआयएसएफ आणि श्वान पथके सतर्क

सुरक्षा दलांच्या क्विक रिअॅक्शन टीम्स सतत गस्त घालत असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. श्वान पथकांचे सतत चेकिंग सुरू आहे. विमानतळावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची व व्यक्तीची काटेकोर तपासणी केली जात आहे.

सुरक्षेचे तीन स्तर अधिक कडक

  • विमानतळ परिसरात सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिस दलाच्या संयुक्त पथकांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. धावपट्टी आणि हँगर परिसरात गस्त वाढवली.
  • हँडबॅग्स आणि लगेजची टर्मिनल एरियात प्रवाशांच्या तपासणी, तर बाह्य परिसरात पार्किंग आणि आगमन व निर्गमन रस्त्यांवर वाहन तपासणी तीव्र करण्यात आली आहे.

 

"दिल्लीत झालेल्या घटनेनंतर नागपूर विमानतळावर तत्काळ हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. सीआयएसएफ, श्वान पथक आणि सशस्त्र कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे. आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत"- आबिद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Airport on High Alert After Delhi Bomb Blast

Web Summary : Following the Delhi bomb blast, Nagpur airport is on high alert. Security has been heightened with increased patrols, checks, and dog squads. Passengers are advised to arrive two hours early due to stricter security measures. CISF and local police are jointly monitoring the situation.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीAirportविमानतळBombsस्फोटके