शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

प्रवाशांना विचारणा... मे आय हेल्प यू ? रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी मदत केंद्र : गर्दी नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात

By नरेश डोंगरे | Updated: April 22, 2024 14:46 IST

नागपूर: मे आय हेल्प यू ? ची हाक देत धावपळ करणाऱ्या प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पथके तैनात

नागपूर : वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांना त्रास होत असल्याचे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर मदत केंद्र तयार केले आहे. धावपळ करणाऱ्या प्रवाशांना या बूथवरून 'मे आय हेल्प यू', अशी विचारणा केली जात आहे.

महिनाभरापासून नागपूर स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. आधीच बाहेरून येणाऱ्या गाड्या प्रवाशांनी खचाखच भरून येत आहे. त्यात नागपूर स्थानकावरून चढणाऱ्या प्रवाशांची भर पडत असल्याने गाड्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. त्यामुळे प्रवासी चक्क टॉयलेटजवळ उभे राहून प्रवास करीत आहेत. त्याचा त्रास कन्फर्म तिकिट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. त्यासंबंधाने रोज मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असल्यामुळे रेल्वेच्या स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. एसी, स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ज्या दर्जाचे तिकिट त्याच डब्यांमध्ये प्रवाशांना चढू दिले जाते. जनरलचे तिकिट घेऊन दुसऱ्या डब्यात शिरणाऱ्या प्रवाशांवर तसेच विनातिकिट प्रवाशांवरही कडक कारवाई करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे.

गर्दीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना डब्यात चढताना, उतरताना त्रास होतो. अशा प्रवाशांना मदत केली जात आहे. गाडी कधी येणार, कोणत्या फलाटावर लागणार, यासंबंधाने माहिती देण्यासाठी किंवा प्रवाशांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर त्यांना ईकडे तिकडे भटकावे लागू नये यासाठी, रेल्वे स्थानकांवर मदत केंद्र (बूथ) लावण्यात आले आहे. येथे प्रवाशांना माहिती देऊन आणि मार्गदर्शन केले जात आहे. गर्दी टाळण्यासाठी जादा भाडे घेऊन जे तिकिट (ईएफटी) दिले जाते, ते बंद करण्यात आले आहे.

विशेष गाड्या वाढविण्यावर भररेल्वेचा प्रवास आरामदायक व्हावा यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करीत असल्याची माहिती रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी दिली आहे. नागपूर-पुणे मार्गावरील गर्दी टाळण्यासाठी विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात आली असून, आठवड्यातून तीन दिवस ती सेवा देत आहे. या शिवाय परप्रांतिय प्रवाशांच्या सेवेसाठी नागपूरहून थेट गोरखपूर(यूपी)साठी विशेष ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही गाडी प्रवाशांना रोज सेवा देत आहे. या शिवायही अन्य आवश्यक उपाययोजना आम्ही करीत असल्याचे अमन मित्तल यांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वेMaharashtraमहाराष्ट्र