शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

नागपुरात पावसाचे थैमान, एकाचा मृत्यू, दोघे वाहून गेले, ११ जणावरे मृत

By आनंद डेकाटे | Updated: July 9, 2025 19:12 IST

Nagpur : ४५७ घरांचे नुकसान, पुरातील १३८ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील १४ पैकी १३ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. उप्पलवाडी येथील १८ वर्षे वयाचा कार्तिक शिवशंकर लाडपे या युवकाचा नाल्याचा प्रवाहात वाहून मृत्यू झाला असून कळमेश्वर तालुक्यातील मौजे बोरगाव येथील अनिल हनुमान पानपत्ते या ३५ वर्षे व्यक्ती नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला असून त्याचा शोध सुरु आहे. नरसाळा-हुडकेश्वर येथील एकव्यक्ती सुद्धा वाहून गेला. जिल्ह्यात सुमारे ११ जनावरे मृत, २ जखमी, सुमारे ४५३ घरांचे अंशत: तर ४ घरांचे पूर्णत: नुकसान झाले.

८ जुलै रोजी जिल्ह्यात सरासरी १४० मिलिमिटर पाऊस झाला. उमरेड आणि कुही तालुक्यात २०० पेक्षा जास्त मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरातही १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत १३८ हून अधिक लोकांना पावसाच्या वेढ्यातून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. बचाव केलेले १३८ नागरीक हे कामठी, नागपूर ग्रामीण, नागपूर शहर व कुही तालुक्यातील आहेत.

२३ पुलांवरून पाणी ओव्हरफ्लो, काही तासांसाठी गावांचा संपर्क तुटला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक नदी,नाले यांना पुर येवून शहरी तसेच ग्रामीण भागातील २३ पुलावरून पाणी ओव्हरफ्लो झाले. काही तासांकरिता काही गावांचा संपर्क तुटला. आलेल्या पुरामध्ये काही नागरीक अडकले असता त्यांना स्थानिक तसेच एसडीआरफ व एनडीआर पथकाच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. नागपूर ग्रामीण तालुक्यात २४६ घरांमध्ये पाणी शिरले. 

विनाकारण घराबाहेर पडू नका , जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनगरज नसल्यास विनाकारण नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता पाऊस वाढण्याची शक्यता लक्षात घेता सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे. नरसाळा हुडकेश्वर येथील एक इसम पाण्यात वाहून गेला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

गरज पडल्यास सैन्यदलाची मदतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवश्यक सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. गरज भासल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) तसेच सैन्यदलाची मदत घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्या असल्याचे जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस