शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Nagpur Rain Updates : शहरात पाणीच पाणी; शाळांना सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 1:25 PM

मुसळधार पावसामुळे उपराजधानीत पाणीचपाणी

नागपूर : उपराजधानी नागपूर येथे सकाळी साडेआठ वाजल्यापासून अवघ्या सहा तासात विक्रमी २६३.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पुढील ४८ तासातदेखील मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून नागपुरातील शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे विधानभवानाच्या कामकाजावरही परिणा झाला आहे.

उपराजधानी नागपुरमध्ये गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूरमधील अनेक भागांमधील वीजपुरवठादेखील खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मुसळधार पावसाचा फटका विधीमंडळाच्या कामकाजालादेखील बसला आहे. आठवडाभर ओढ दिल्यानंतर काल रात्रीपासून वरुणराजानं नागपूर शहराला झोडपण्यास सुरुवात केली. गुरुवारी रात्री नागपुरात पावसाची संततधार सुरू होती. सकाळी आठनंतर पावसाचा जोर वाढला. नागपूरकरांना आज फार काळ सूर्याचं दर्शनही घडलं नाही. दिवस सुरू होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं. अनेकांच्या घरांमध्येही पाणी शिरल्यानं सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले. काल सकाळी 8 ते आज सकाळी 8 या कालावधीत नागपुरात 61.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पुढील आठवडाभर नागपुरमध्ये पावसाचा जोर कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.Live Updates:

  • नागपुरात 263 मिमी पावसाची नोंद. 
  • नागपुरातील शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर.
  • शहरात मुसळधार पाऊस.
  • स्मार्ट अण्ड सस्टेनेबल सिटी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला भेट; पाणी तुंबलेल्या भागांची पाहणी.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्यात; विमानतळातून बाहेर पडणारा रस्ता पूर्ण पाण्याखाली.
  • अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं सर्वसामान्यांचे हाल.
  • विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेच्या शासकीय निवासस्थानात शिरलं पाणी.
टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊसNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस