शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

ह्रदयद्रावक... कोविड सेंटरमधून तो पळाला, 35 वर्षीय युवकाचा सकाळी मृतदेहच मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 20:43 IST

उमरेड येथील हृदय हेलावून टाकणारी घटना

ठळक मुद्देराजेश नान्हे खासगी चारचाकी वाहने किरायाने देण्याचा व्यवसाय करीत होता. अचानक तो कोरोनाबाधित झाला. त्याला १४ एप्रिल रोजी उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नागपूर (उमरेड) : कोविड सेंटरमध्ये नजरेसमोरच दोन जणांचा जीव गेला. या धक्यातून तो स्वत:ला सावरु शकलाच नाही. रात्री उशीरा आॅक्सीजन काढल्यानंतर आरोग्य यंत्रनेला हुलकावणी देत त्याने पळ काढला. त्यामुळे, सर्वत्र खळबळ उडाली, शोधकार्यासाठी धावपळ सुरु झाली. पोलीस ठाण्यात याबाबत सूचनाही देण्यात आली. अखेरीस सकाळी ‘त्या’ रुग्णाचे प्रेतच रस्त्यावर आढळून आले. उमरेड येथील या घटनेमुळे समाजमन सून्न झाले आहे. राजेश बाबुराव नान्हे (३५, रेवतकर ले आऊट, उमरेड) असे मृताचे नाव आहे.

राजेश नान्हे खासगी चारचाकी वाहने किरायाने देण्याचा व्यवसाय करीत होता. अचानक तो कोरोनाबाधित झाला. त्याला १४ एप्रिल रोजी उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री तो कोविड सेंटरमधून पळाला. सर्वत्र शोधाशोध सुरु झाली. अखेरीस नगर परिषद इतवारी प्राथमिक शाळेलगत तो मृतावस्थेत आढळून आला. नगर पालिका कर्मचारी आणि कुटूंबातील काही सदस्यांनी योग्य खबरदारी घेत त्याचा अंत्यविधी पार पाडला. राजेश पश्चात पत्नी, दोन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे. तो कर्ता असल्याने त्याच्या मृत्यूमुळे कुटूंबियांना धक्का बसला आहे.

सुरक्षित बॉडी कीटची कमतरताशनिवारी सकाळच्या सुमारास कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर अंत्यविधी उरकविण्यासाठी सुरक्षित बॉडी कीटच उपलब्ध नव्हती. ग्रामीण रुग्णालयाचा थातूरमातूर आणि बोलबच्चन कारभार पुन्हा एकदा या घटनेमुळे चव्हाट्यावर आला. त्यानंतर लागलीच नगर पालिकेने शनिवारी तातडीने ४० सुरक्षित बॉडी कीट बोलाविल्या आणि अंत्यविधी पार पाडले. 

टॅग्स :nagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसDeathमृत्यू