शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

२२ दिवसांपासून थांबल्या हृदय शस्त्रक्रिया

By admin | Updated: November 3, 2014 00:40 IST

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील हृदयरोग व उरोशल्यचिकित्सा विभागातील (सीव्हीटीएस) शस्त्रक्रिया गृह तब्बल २२ दिवसांपासून बंद आहे. बांधकाम विभागाच्या गलथानपणाचा फटका हृदयरुग्णांना

सुपर स्पेशालिटी रुग्णालय : बांधकाम विभागाच्या गलथानपणाचा फटका रुग्णांनानागपूर : सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील हृदयरोग व उरोशल्यचिकित्सा विभागातील (सीव्हीटीएस) शस्त्रक्रिया गृह तब्बल २२ दिवसांपासून बंद आहे. बांधकाम विभागाच्या गलथानपणाचा फटका हृदयरुग्णांना बसत असल्याने त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत तब्बल ५० वर रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.हृदयरोग हा आजार आता केवळ श्रीमंतांचाच राहिलेला नाही, तो झोपडपट्टीपर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्य गरीब माणसाला हृदयरोग झाल्यास अत्यंत कमी खर्चात उपचार मिळावेत या दृष्टीने मेडिकल रुग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हृदयरोग व उरोशल्यचिकित्सा विभाग सुरू झाला. खासगी रुग्णालयासही लाजवेल असे या विभागाचे शस्त्रक्रिया गृह आहे. या विभागात बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी करण्यात येतात. रुग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू झाल्यापासून येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. बाह्यरुग्ण विभागात रोज तीन ते चार रुग्ण शस्त्रक्रियेसाठी येतात. यामुळे प्रतीक्षेची यादी शंभरावर गेली आहे, असे असताना या विभागाचे शस्त्रक्रिया गृह तब्बल तीन आठवड्यांपासून बंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रिया गृहातील पाईपलाईनला गळती लागली होती. याच्या दुरुस्तीसाठी मेडिकलच्या बांधकाम विभागाला सूचना देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्याने याची पाहणी करून दोन-चार दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र २२ दिवस या कामासाठी लावले. या दिवसांत एकही बायपास सर्जरी झाली नाही. परिणामी शस्त्रक्रिया रुग्णांची यादी फुगली. सध्याच्या घडीला गंभीर रुग्णांचे नातेवाईक शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांकडे तगादा लावत आहे तर काही आजी-माजी आमदारांकडून वरिष्ठ डॉक्टरांवर दबाव आणत आहे. परंतु शस्त्रक्रिया गृहच बंद असल्याने डॉक्टर हार्ट सर्जरी होणार नसल्याचे रु ग्णांना सांगत आहे. अनेक रुग्ण पदरमोड करून खाजगी रु ग्णालयाचा रस्ता धरत आहे. (प्रतिनिधी)