विहिरीत उडी मारलेल्या बायकोला वाचवायला गेला आणि जीव गमावून बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 21:56 IST2022-01-08T21:50:12+5:302022-01-08T21:56:00+5:30

Nagpur News रागाच्या भरात विहीरीत उडी मारलेल्या बायकोला वाचवायला त्याने विहीरीत उडी मारली. तिला वाचवले पण पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली.

He went to the rescue of his wife who jumped into the well and lost his life |  विहिरीत उडी मारलेल्या बायकोला वाचवायला गेला आणि जीव गमावून बसला

 विहिरीत उडी मारलेल्या बायकोला वाचवायला गेला आणि जीव गमावून बसला

नागपूर : स्वयंपाकावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यावरून रागाच्या भरात पत्नीने विहिरीत उडी घेतली. तिला वाचविण्यासाठी पतीनेही विहिरीत उडी घेतली. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी शहरातील वाॅर्ड क्र. ३ श्रीकृष्णनगर येथे शुक्रवारी (दि.७) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

अमर गणेश बागडे (२५, रा. श्रीकृष्णनगर, बुटीबाेरी) असे मृताचे नाव आहे. मृत अमर व त्याची पत्नी ममता बागडे हिच्याशी स्वयंपाक का झाला नाही या कारणावरून घरगुती भांडण झाले. त्यावरून रागाच्या भरात त्याच्या पत्नीने विहिरीत उडी घेतली. लागलीच तिला वाचविण्यासाठी अमरनेही विहिरीत उडी घेतली. धडपड करीत त्याने पत्नीचा जीव वाचविला. मात्र त्याला पाेहता येत नसल्याने विहिरीतील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. नागरिकांनी त्याला विहिरीतून बाहेर काढत खासगी हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले.

घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी गणेश पांडुरंग बागडे (५०, रा. श्रीकृष्णनगर, बुटीबाेरी) यांच्या तक्रारीवरून बुटीबाेरी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, घटनेचा पुढील तपास सहायक फाैजदार सुरेश धवराळ करीत आहेत.

Web Title: He went to the rescue of his wife who jumped into the well and lost his life

टॅग्स :Deathमृत्यू