पतंग पकडण्यासाठी तो गच्चीवर धावला आणि घात झाला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 22:41 IST2021-12-10T22:40:34+5:302021-12-10T22:41:26+5:30
Nagpur News पतंग पकडण्यासाठी छतावर चढलेल्या तरुणाचा तोल जाऊन पडल्याने त्याचा करुण अंत झाला.

पतंग पकडण्यासाठी तो गच्चीवर धावला आणि घात झाला...
नागपूर - पतंग पकडण्यासाठी छतावर चढलेल्या तरुणाचा तोल जाऊन पडल्याने त्याचा करुण अंत झाला. मयूर विष्णू वैद्य (वय २३) असे त्याचे नाव आहे. तो कोतवालीतील शिवाजीनगरात राहत होता. गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पतंग पकडण्यासाठी मयूर वर बघत छतावर चढला. अचानक पाय घसरल्याने तो छतावर पडला. त्यामुळे मयूरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----