‘घरवाली’ असताना ‘बाहरवाली’ आणली, हटकल्याने आई-बहिणीवरच शस्त्र उगारले

By योगेश पांडे | Updated: December 4, 2023 22:44 IST2023-12-04T22:44:19+5:302023-12-04T22:44:36+5:30

अखेर आईला स्वत:च्याच मुलाविरोधात पोलिसांकडे धाव घ्यावी लागली. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

he raised arms against her mother and sister crime registered | ‘घरवाली’ असताना ‘बाहरवाली’ आणली, हटकल्याने आई-बहिणीवरच शस्त्र उगारले

‘घरवाली’ असताना ‘बाहरवाली’ आणली, हटकल्याने आई-बहिणीवरच शस्त्र उगारले

नागपूर : घरात लग्न करून आणलेली पत्नी असतानादेखील एका बाहेरख्याली तरुणाने त्याच्या प्रेयसीला घरी आणले. यावरून त्याची बहीण व आईने प्रेयसीला टोकल्याने संतप्त झालेल्या तरुणाने त्यांच्यावर शस्त्र उगारत घरी राडा घातला. त्याने घरच्याच सीसीटीव्हीचीदेखील तोडफोड केली. अखेर आईला स्वत:च्याच मुलाविरोधात पोलिसांकडे धाव घ्यावी लागली. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

रोहित असे संबंधित तरुणाचे नाव असून तो बेरोजगार आहे. त्याच्या कुटुंबात आई, बहीण, पत्नी आहे. मात्र, तरीदेखील तो बाहेरच्या मुलींशी अनैतिक संबंध ठेवत असतो. त्याला त्यावरून टोकले की तो वाद घालतो. त्याच्या या सवयीला कंटाळून घरच्यांनी त्याला घराबाहेर हाकलले आहे. मात्र, घरी कुणीच नसले की तो मुली घेऊन येतो. काही दिवसांअगोदर तो एका प्रेयसीला घरी घेऊन आला. ही बाब कुटुंबीयांना कळाल्यावर त्यांनी प्रेयसीच्या कुटुंबीयांना या प्रकाराची कल्पना दिली.

यावरून आरोपी चिडला व त्याने घरी जात राडा घातला. त्याने त्याची आई व बहिणीवरच शस्त्र उगारले आणि घरच्या वस्तूंची तोडफोड केली. त्याने घरातील सीसीटीव्हीदेखील फोडले. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांना फोन लावला. त्यानंतर आरोपी मुलगा तेथून फरार झाला. त्याच्या आईच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: he raised arms against her mother and sister crime registered