शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

वडिलांकडून २० लाखांची खंडणी उकळण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 1:27 AM

स्वत:च्या अपहरणाचा कट रचून वडिलांकडून २० लाखांची खंडणी उकळण्याचा एका तरुणाचा डाव एमआयडीसी पोलिसांनी उघडा पाडला. पोलिसांनी ताब्यात घेताच त्या तरुणाने मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी आपणच आपल्या अपहरणाचा कट रचला होता, अशी कबुली दिली. परिणामी पोलिसांनी त्याला त्याच्या एका साथीदारासह अटक केली. तिसरा आरोपी फरार आहे.

ठळक मुद्देस्वत:च रचला स्वत:च्या अपहरणाचा कट : एमआयडीसी पोलिसांनी डाव उलटवला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या अपहरणाचा कट रचून वडिलांकडून २० लाखांची खंडणी उकळण्याचा एका तरुणाचा डाव एमआयडीसी पोलिसांनी उघडा पाडला. पोलिसांनी ताब्यात घेताच त्या तरुणाने मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी आपणच आपल्या अपहरणाचा कट रचला होता, अशी कबुली दिली. परिणामी पोलिसांनी त्याला त्याच्या एका साथीदारासह अटक केली. तिसरा आरोपी फरार आहे.गौरव प्रदीप दिनकर (वय २०) असे या कथित अपहरणकांडातील सूत्रधाराचे नाव आहे. त्याचे वडील प्रदीप रामकृष्ण दिनकर (वय ५१) शिक्षक असून ते वानाडोंगरीत राहतात. गौरव याने वैमानिकाशी संबंधित कामकाजाचे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणानंतर संबंधित प्रशिक्षणार्थ्याला विमानतळावर वेगवेगळी जबाबदारी मिळते. मात्र गौरवला कोणतेच काम मिळाले नाही. त्यामुळे तो निराश झाला होता. त्याला मित्रांसोबत मौजमजा करण्याची सवय जडल्याने आणि पालकांकडून पाहिजे त्या प्रमाणात रक्कम मिळत नसल्याने गौरव अस्वस्थ होता. झटपट मोठी रक्कम मिळवण्यासाठी काय करावे, असा त्याच्यासमोर प्रश्न होता. त्याचा मित्र आरोपी सागर विक्रम बग्गा (वय २३) हा भामटी परसोडीत राहतो. तो टॅक्सीचालक आहे तर, दुसरा एक आरोपी राजू हरडे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतो. या दोघांसमोर त्याने झटपट लाखोंची रक्कम मिळवण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा कट बोलून दाखवला. माझ्या वडिलांना फोन करून तुम्ही २० लाखांची खंडणी मागा, रक्कम मिळताच ती आपण समप्रमाणात वाटून घेऊ आणि नंतर मौजमजा करू. वडील पोलिसांकडे जाणार नाही, अशी हमीही त्याने आरोपी सागर आणि राजूला कटकारस्थानात सहभागी करून घेताना दिली. त्यानुसार, गुरुवारी दुपारी गौरव, सागर आणि राजू तिघेही वानाडोंगरीतून बाहेर पडले. दुपारी १ वाजता आरोपीने गौरवच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केला. ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असून तो सुखरूप हवा असेल तर २० लाख रुपये खंडणी द्या. पोलिसांना सांगितल्यास गौरवला ठार मारू’, अशी धमकीही आरोपींनी दिली. या फोनमुळे घाबरलेल्या दिनकर यांनी लगेच एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली. २० लाखांच्या खंडणीसाठी शिक्षकाच्या मुलाचे अपहरण झाल्याचे कळताच ठाणेदार भारत क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना शोधण्यासाठी धावपळ सुरू केली.त्यानुसार, खंडणीची रक्कम कुठे आणून द्यायची, असे सांगणारा दुसरा फोन येताच दिनकर यांनी मुलाला काही करू नका, आपण रक्कम द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानंतर एका बॅगमध्ये रक्कम घेऊन दिनकर आरोपी सांगत असलेल्या ठिकाणावर जाऊ लागले. दुपारपासून रात्री ७ वाजेपर्यंत आरोपी प्रतापनगर, खामला, सीताबर्डीसह ठिकठिकाणी दिनकर यांना बोलवत होते. पोलीस मागावर असल्याचा संशय आला म्हणून की काय ते स्वत: त्या ठिकाणी रक्कम घ्यायला येत नव्हते. अखेर ७ वाजता गौरवचाच फोन वडिलांना आला. आपले अपहरण करणाºयांनी रेल्वेस्थानकावर सोडल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे दिनकर यांनी रेल्वेस्थानकाजवळ जाऊन त्याला सोबत आणले. गौरव मिळताच त्याला एमआयडीसी ठाण्यात आणण्यात आले. त्याचे संशयास्पद वर्तन आणि तो वारंवार अपहरणाची विसंगत माहिती देत असल्यामुळे पोलिसांनी त्याला आपल्या भाषेत विचारणा केली. प्राथमिक चौकशीतच गौरवने अपहरण झालेच नाही, आपणच वडिलांकडून रक्कम काढण्यासाठी हा डाव टाकला होता, असे कबूल केले. या डावबाजीत सागर बग्गा आणि राजू हरडे सहआरोपी असल्याचेही त्याने कबूल केले. त्यानुसार, पोलिसांनी गौरव आणि सागरला अटक केली. राजू फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.पैसे मिळण्याचा होता विश्वास !स्वत:च्या वडिलांकडून रक्कम उकळण्यासाठी कथित अपहरणाचा डाव रचणारा गौरव याला खंडणीची रक्कम वडिलांकडून हमखास मिळेल, वडील पोलिसांकडे जाणार नाही, असा विश्वास होता. त्यामुळे तो गणेश टेकडी परिसरात बसून रकमेची वाट बघत होता. मात्र, त्याचे वडील पोलिसांकडे गेल्याने त्याच्या कटकारस्थानावर पाणी फेरले गेले. एका कथित अपहरणाचा कट उधळून आरोपींना अटक करण्याची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी मारूती शिंदे यांच्या नेतृत्वात ठाणेदार भारत क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक