नागपुरात ४३ प्लॉटवरील अतिक्रमणावर हातोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:23 AM2019-01-31T00:23:44+5:302019-01-31T00:25:02+5:30

रिंगरोडमुळे बाधित झालेल्यांचे पुनवर्सन करून त्यांना पर्यायी देण्यात आली होती. त्यानंतरही नासुप्रच्या बाबुळखेडा येथील जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण के ले होते. नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी येथील अतिक्रमण हटविले.

Hammered on the encroachers of 43 plots in Nagpur | नागपुरात ४३ प्लॉटवरील अतिक्रमणावर हातोडा 

नागपुरात ४३ प्लॉटवरील अतिक्रमणावर हातोडा 

Next
ठळक मुद्देनासुप्रची कारवाई : जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी दिले होते निर्देेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रिंगरोडमुळे बाधित झालेल्यांचे पुनवर्सन करून त्यांना पर्यायी देण्यात आली होती. त्यानंतरही नासुप्रच्या बाबुळखेडा येथील जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण के ले होते. नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी येथील अतिक्रमण हटविले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांच्या तक्रारीनुसार नासुप्रच्या दक्षिण विभागाच्या कार्यक्षेत्रातील मौजा-बाबुळखेडा येथील खसरा क्रमांक ६८/१ क, ६८/१ ख येथील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नासुप्रचे अधीक्षक अभियंता (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी येथील अतिक्रमण हटविले.
अधिनिष्कासितांचे अनधिकृत बांधकाम काढण्याची कार्यवाही नागपूर सुधार प्रन्यासचे दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता (दक्षिण) संजय एन. चिमूरकर, विभागीय अधिकारी (दक्षिण) अविनाश बडगे, सहायक अभियंता संदीप एम. राऊत, पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. यात अजनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच. एल. उरलागोंडावार व ५० पोलीस अधिकारी तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील सहभागी होते.
रिंगरोडच्या बांधकामादरम्यान ज्या भूखंडधारकांचे प्लॉट रिंगरोडने बाधित झाले होते अशा सर्व बाधितांचे पुर्नवसन करण्याकरिता यूएलसीद्वारे सन १९९१ ला नागपूर सुधार प्रन्यासच्या बाबुळखेडा, शताब्दीनगर येथे जमीन देण्यात आली होती. त्यावर प्रन्यासद्वारे अभिन्यास तयार करून १०४ बाधितांना भूखंड वाटप करण्यात आले होते. परंतु सदर जागेवर खासगी अनधिकृत अभिन्यास सन १९७३ पासून वसलेले असल्यामुळे तेथील भूखंडधारकांनी न्यायालयात धाव घेतली. त्याअनुषंगाने शासनाचे ८ सप्टेंबर २०१७ च्या आदेशान्वये नासुप्र मौजा-बेसा, खसरा क्रमांक ६६/१ व ६६ येथील १३,३३१.८५ चौ.मी. जागा बाधितांना पुनर्वसनासाठी देण्यात आली व खांडेकर ले-आऊट येथील भूखंडधारकांचे भूखंड गुंठेवारीअंतर्गत नासुप्रद्वारे नियमित करण्यात आले. त्याअनुषंगाने मौजा-बेसा येथे नवीन अभिन्यास निर्माण करून बाधितांना भूखंड वाटप करण्यात आले होते. परंतु बाधितांनी बेसा येथील भूखंडाचा ताबा घेतला; परंतु बाबुळखेडा येथील भूखंडाचा ताबा सोडला नव्हता.

Web Title: Hammered on the encroachers of 43 plots in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.