नागपुरात गारपीट, बहुतेक भागात वावटळ; आठवडाभर अवकाळीचा अंदाज

By निशांत वानखेडे | Updated: May 3, 2025 20:30 IST2025-05-03T20:29:40+5:302025-05-03T20:30:19+5:30

पावसाळी स्थिती असतानाही तापमान २ अंशाने वधारले, मात्र आकाशात सर्वत्र पसरलेल्या ढगांच्या सावलीने नागपूरकरांना उन्हाचे चटके बसू दिले नाही.

Hailstorm in Nagpur, tornado in most areas; Severe weather forecast for the week | नागपुरात गारपीट, बहुतेक भागात वावटळ; आठवडाभर अवकाळीचा अंदाज

नागपुरात गारपीट, बहुतेक भागात वावटळ; आठवडाभर अवकाळीचा अंदाज

नागपूर : हवामान विभागाने वर्तविलेला अवकाळी पावसाचा अंदाज नागपूरकरांसाठी सहा दिवसानंतर खरा ठरला. शनिवारी शहरातील काही भागात गारपीट व वादळासह जाेरदार पावसाने हजेरी लावली. इतर भागात पाऊस नव्हता पण वादळी वारे वाहत राहिले. पावसाळी स्थिती असतानाही तापमान २ अंशाने वधारले, मात्र आकाशात सर्वत्र पसरलेल्या ढगांच्या सावलीने नागपूरकरांना उन्हाचे चटके बसू दिले नाही.

एप्रिलच्या २७ तारखेपासूनच विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला हाेता. गडचिराेली व गाेंदिया जिल्ह्यात त्यानुसार ढगांनी बरसात केली. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरीमध्येही पावसाने हजेरी लावली. यातून नागपूर व इतर शहरे मात्र सुटली. नागपुरला चार-पाच दिवसांपासून उन-सावलीचा खेळ सुरू आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण तयार हाेते पण दिवसभर नागरिकांना तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. तापमान ४० ते ४२ अंशादरम्यान नाेंदविले जात आहे. शनिवारीही यात २.२ अंशाची वाढ हाेत पारा ४१.६ अंशावर पाेहचला.

तापमान वाढले खरे पण त्याचा त्रास नागरिकांना झाला नाही. सकाळपासून जाणवलेले साैर चटके दुपारी कमी झाले. दुपारी अचानक सर्व आकाश ढगांनी व्यापून घेतले आणि वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. काही भागात व विशेषत: पूर्व नागपूरच्या वस्त्यांमध्ये वादळासह जाेरदार पाऊस बरसला. किमान तासभर चाललेल्या या पावसादरम्यान गारांचीही बरसात झाली. वादळी पावसाने पूर्वच्या वस्त्यांमध्ये झाडे काेसळली व वीजेची तारे तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला हाेता. अचानक आलेल्या वादळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

नागपूरसह गाेंदिया व ब्रम्हपुरीतही जाेरदार पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे चंद्रपूरला मात्र आजही उन्हाचे चटके बसले. येथील पारा वाढून ४३.४ अंशावर गेला. पश्चिम विदर्भातील शहरांचा ताप कायम राहिला. अकाेल्यात शनिवारीही ४४.३ अंश तापमानाची नाेंद झाली, जी राज्यात सर्वाधिक आहे. यवतमाळ, वाशिमचा पारासुद्धा ४३ अंशाच्या पार गेला.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक भागात येत्या १० मे पर्यंत अवकाळी पावसाची स्थिती राहणार आहे. त्यानुसार तापमानात एक-दाेन अंशाची वाढही हाेण्याचा अंदाज आहे.

Web Title: Hailstorm in Nagpur, tornado in most areas; Severe weather forecast for the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.