शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पांढऱ्याशुभ्र नाजूक हलव्याच्या लॅपटॉपसह गिटार, स्टेथॅस्कोप आणि बरंच काही.... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:36 AM

धरमपेठ भागात असलेल्या माता मंदिरात माहेर महिला मंडळाच्या फक्त चार सदस्यांनी १९९३ साली हा उपक्रम सुरू केला. प्रारंभी हौस म्हणून सुरू केलेला हा प्रयोग पुढे अव्याहत सुरू असणारा आणि देशविदेशात नावाजला गेलेला यशस्वी उद्योग बनला.

ठळक मुद्देनागपुरातील २५ वर्षांपासूनची कलात्मक परंपराजान्हवी मंगळसूत्र व पद्मावती हाराला सर्वाधिक मागणीदागिने व अन्य वस्तूंची १०० हून अधिक व्हरायटी

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लॅपटॉप, गिटार, स्टेथॅस्कोप किंवा विमान या वस्तूंचा मकरसंक्रांतीशी काही संबंध असेल असे प्रथमदर्शनी तरी वाटत नाही. पण जेव्हा या आणि यांच्यासह तुम्हाला ज्या ज्या हव्याशा वाटतील त्या त्या सर्व वस्तू अतिशय बारीक, नाजूक व पांढऱ्याशुभ्र हलव्याने बनवलेल्या जेव्हा समोर येतात तेव्हा मन थक्क होऊन जाते. ही किमया साधली आहे नागपुरातील मोहक आर्टस्च्या २५ कलावंतांना.धरमपेठ भागात असलेल्या माता मंदिरात माहेर महिला मंडळाच्या फक्त चार सदस्यांनी १९९३ साली हा उपक्रम सुरू केला. प्रारंभी हौस म्हणून सुरू केलेला हा प्रयोग पुढे अव्याहत सुरू असणारा आणि देशविदेशात नावाजला गेलेला यशस्वी उद्योग बनला. मोहक आर्टस् या नावाने सुरू असलेला हा व्यवसाय त्याच्या संस्थापक सदस्य सौ. सुरेखा देशपांडे यांच्यासह सध्या २५ स्त्रिया चालवीत आहेत.मकरसंक्रांतीला लागणारे पारंपारिक दागिने तर येथे अतिशय कलात्मकरित्या बनवले जातातच. शिवाय ज्यांची जशी मागणी असेल तशा वस्तू आम्ही बनवूनही देतो असे सुरेखा देशपांडे यांचे सांगणे आहे. एकदा एक सूनबाई मेडिकल फील्डच्या होत्या, त्यांच्या सासूबाईंच्या आग्रहाखातर आम्ही हलव्याचा स्टेथॅस्कोप बनवून दिला. एका जावयाला गिटारची आवड होती तर त्यांच्यासाठी हलव्याची गिटार बनवली होती. यंदा एका टेक्नोसॅव्ही लेकीसाठी लॅपटॉप बनविला आहे. याखेरीज तबला डग्गा, हार्मोनियम यांचीही मागणी असतेच.दागिने हलव्याचे असो वा सोन्याचांदीचे, त्यावर तत्कालीन सिरीयल्स व सिनेमातील फॅशनचा मोठा प्रभाव असतो. तो येथेही पहायला मिळतो. यंदा पद्मावती किंवा म्हाळसा हाराला जास्त मागणी आहे. तसेच जान्हवी मंगळसूत्रही आवर्जून बनवण्यास सांगितले जाते.येथे बनवल्या जाणाऱ्या दागिन्यांसाठी लागणारा हलवा याच मंडळातील एक सदस्य बनवतात. त्यांना एका सीझनला किमान दिडशे ते दोनशे किलो हलवा लागतो. त्यात खसखशीच्या दाण्यावर बनलेला नाजूकसा हलवा सर्वात जास्त लागतो. बाकी तीळ, तांदूळ व साबुदाण्यावरचाही हलवा येथील दागिन्यांवर पहायला मिळतो.आम्ही आॅगस्टपासूनच हलव्याचे दागिने बनवण्यास सुरुवात करतो. कारण दिवाळसणासाठी परदेशातून लेक, सुना, जावई व मुली येणार असतात. त्यांना हे दागिने सोबतच न्यायचे असतात. त्यामुळे बहुतेक वेळेस आमचे दागिने दिवाळीतच तयार असतात. हलव्याच्या या सर्व दागिन्यांची किंमत 100 ते 800 रुपयांच्या दरम्यान आहे. संक्रांतीच्या दागिन्यांव्यतिरिक्त मोहक आर्टस्मध्ये वर्षभर रुखवत, फुलांच्या रांगोळ्या, लग्नाची आरास, डोहाळजेवण, बारसं याच्या सजावटीचीही कामे केली जातात. मंडळाच्या कल्याणी भूत, साधना पांडे, मीनाक्षी करंडे यांच्यासह अन्य दिवसरात्र येथे आपल्या कलात्मकतेला मेहनतीची जोड देऊन उत्तमोत्तम वस्तू बनवण्यात गर्क असतात. दुपारी १ ते रात्री ९ पर्यंतची ही कलासाधना त्या सर्वांच्या आयुष्याला जो हलव्याचा गोडवा देऊन जात असते त्याचे कौतुक व सार्थ अभिमान या सर्वांच्या चेहऱ्यावर पहायला मिळतो.  

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८