जीएसच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 01:11 AM2018-08-08T01:11:11+5:302018-08-08T01:11:53+5:30

जीएस कॉलेजचा बारावीचा विद्यार्थी राहुल तिवारी (वय १६) याच्या मृत्यूप्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर राहुलच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.

GS students death case, filed FIR | जीएसच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

जीएसच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देआरोपी अल्पवयीन विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीएस कॉलेजचा बारावीचा विद्यार्थी राहुल तिवारी (वय १६) याच्या मृत्यूप्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर राहुलच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.
२ आॅगस्टच्या दुपारी कॉलेजच्या परिसरात राहुलचा मृत्यू झाला होता. दोषी विद्यार्थी (वय १६) राहुलसोबतच शिकायचा. त्यांच्यात दुपारी वाद झाला. राहुलकडून मारहाण झाल्याने दोषी विद्यार्थ्याने एक थापड मारून राहुलला जोराचा धक्का मारल्याने तो खाली पडला आणि गतप्राण झाला. कॉलेज प्रशासनाने ही गंभीर बाब प्रारंभी लपवून ठेवल्याचा आरोप आहे. ३ आॅगस्टला त्याची माहिती झाल्याने संतप्त तिवारी परिवार आणि स्वकीयांनी कॉलेजमध्ये जाऊन आपला रोष निर्माण केला. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. चौकशीत राहुल आणि दोषी विद्यार्थ्यामध्ये वाद झाल्याचे स्पष्ट झाले. राहुलने मारल्यामुळे दोषी विद्यार्थ्यानेही त्याला एक थापड मारून जोराचा धक्का दिला. त्यामुळे खाली पडून जबर दुखापत झाल्याने राहुलचा मृत्यू झाला. हा प्रकार उघड झाल्यानंतर ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून या प्रकरणात मंगळवारी सायंकाळी दोषी विद्यार्थ्याविरुद्ध कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून घेतला. दोषी विद्यार्थी अल्पवयीन असल्यामुळे त्याला अटक करता येत नाही. मात्र, त्याला ताब्यात घेऊन त्याची सुधारगृहात रवानगी केली जाणार आहे.

 

Web Title: GS students death case, filed FIR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.