शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गजांचा दारुण पराभव

By admin | Updated: May 17, 2014 01:04 IST

१६ व्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात अनेक दिग्गजाचा दारुण पराभव झाला. यात केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक व विलास मुत्तेमवार, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव ...

जनादेश : प्रफुल्ल पटेल, मोघेंचा समावेश

नागपूर : १६ व्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात अनेक दिग्गजाचा दारुण पराभव झाला. यात केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक व विलास मुत्तेमवार, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे या नेत्यांचा समावेश आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघातून दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांना काँग्रेस आघाडीची उमेदवारी देण्यात आली होती. युतीचे रामदास तडस यांनी ५ लाख ३७ हजार ५१८ मते घेऊन सागर मेघे यांचा २ लाख १५ हजार ८७३ मतांनी पराभव केला आहे. मेघे यांना ३ लाख २१ हजार ७३५ मते मिळाली आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खा. आनंदराव अडसूळ यांनी ४ लाख ६७ हजार २१२ मते प्राप्त केली. त्यांनी राष्ट्रवादीच्या नवनीत राणा यांचा १ लाख ३७ हजार ९३२ मतांनी पराभव केला. राणा यांना ३ लाख २९ हजार २८0 मते मिळाली.

चंद्रपूरमध्ये खा. हंसराज अहीर यांनी ५ लाख ८ हजार ४९ मते घेऊन बाजी मारली आहे. त्यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांचा २ लाख ३६ हजार २६९ मतांनी पराभव केला आहे. देवतळे यांना २ लाख ७१ हजार ७८0 मते पडली आहेत. अकोल्यात पुन्हा एकदा भाजपचे संजय धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी ४ लाख ५६ हजार ४७२ मते घेत काँग्रेसचे हिदायत पटेल यांचा २ लाख १ हजार ११६ मतांनी पराभव केला. भारिप-बमसंचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ३८ हजार ७७६ मते मिळाली आहेत.

अकोल्याप्रमाणे शिवसेना यवतमाळ-वाशिम आणि बुलडाणा मतदारसंघही कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून भावना गवळी यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांचा ९३ हजार ८१६ मतांनी पराभव केला आहे. गवळी यांना ४ लाख ७७ हजार ९0५ मते आणि मोघे यांना ३ लाख ८४ हजार ८९ मते मिळाली आहेत. बुलडाणा मतदारसंघात प्रतापराव जाधव यांनी ५ लाख ९ हजार १४५ मते घेऊन राष्ट्रवादीचे आ. कृष्णराव इंगळे यांचा १ लाख ५९ हजार ५७९ मतांनी पराभव केला. इंगळे यांना ३ लाख ४९ हजार ५६६ मते मिळाली आहेत. चिमूर-गडचिरोली मतदारसंघात भाजपचे अशोक नेते यांनी ५ लाख ३५ हजार ९८२ मते घेऊन काँग्रेस आघाडीचे डॉ. नामदेव उसेंडी यांचा पराभव केला. उसेंडी यांना २ लाख ९९ हजार १२ मते मिळाली आहेत. नेते २ लाख ३६ हजार ९७0 मताधिक्याने विजयी झाले आहेत.