शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

माओवाद निपटून काढण्यात सरकारला यश येईल

By admin | Updated: May 15, 2015 02:38 IST

माओवादाला आम्ही आव्हान म्हणून स्वीकारले आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.

गृहमंत्री राजनाथसिंग यांची ग्वाही : नक्षलग्रस्त भागातील समस्यांचा आढावानागपूर : माओवादाला आम्ही आव्हान म्हणून स्वीकारले आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. माओवाद निपटून काढण्यात सरकारला यश येईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी केला. राज्यातील नक्षलग्रस्त भागातील स्थिती आणि तेथील समस्यांचा आढावा गुरुवारी रविभवनात संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गृहमंत्री म्हणाले, देशाच्या सर्व क्षेत्राचा आणि सर्व स्तराचा विकास व्हावा, अशी इच्छा असल्यामुळे आम्ही सत्तेत येताच माओवाद्यांशी चर्चा करून नक्षल समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले. मात्र, चर्चेला त्यांची तयारी नाही आणि त्यातून या समस्येचे निराकरण होणार नसल्याचे ध्यानात आल्यामुळे आता माओवाद्यांच्या भाषेतच त्यांना उत्तर देण्याची सरकारने तयारी केली आहे. त्यासाठी नक्षलगस्त भागात सुसज्ज हत्यारे, मोठे मनुष्यबळ दिले जात आहे. आरआरपी-२ सारख्या योजना राबवून नक्षल समस्येला तोंड देण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लान’सुद्धा तयार करण्यात आल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. गडचिरोली - गोंदियातील नक्षलग्रस्त भागात काय हवे, काय नको, त्याची स्थिती जाणून घेतली आणि आवश्यक सोयी, सुविधांसाठी प्रपोजल मागवून घेतल्याचेही त्यांनी सांगितले. येथे जे जे हवे ते उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी प्रारंभीच दिली. यावेळी खासदार अजय संचेती, सीआरपीएफचे निवृत्त महासंचालक विजयकुमार पोलीस महासंचालक संजीव दयाल उपस्थित होते. पत्रकारपरिषदेपूर्वी झालेल्या नक्षल आढावा बैठकीला विजयकुमार आणि दयाल यांच्यासह नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख अनुपकुमार सिंह, गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक रवींद्र कदम तसेच गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)