शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तंत्रनिकेतनच्या शताब्दी वर्षसोहळ्याला प्रारंभ

By admin | Updated: July 16, 2014 01:19 IST

उपराजधानीसोबतच मध्य भारतातील महत्त्वाची तंत्रनिकेतन संस्था असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या स्थापनेला सोमवारी १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने संपूर्ण वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात

नागपूर : उपराजधानीसोबतच मध्य भारतातील महत्त्वाची तंत्रनिकेतन संस्था असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या स्थापनेला सोमवारी १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने संपूर्ण वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. यादरम्यान निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्या हस्ते या सोहळ्याची औपचारिक सुरुवात करण्यात आली.शासकीय तंत्रनिकेतन नागपूरची स्थापना १४ जुलै १९१४ रोजी झाली होती. १०० वर्षांचा इतिहास लाभलेले शासकीयतंत्र निकेतन ही राज्यातील सर्वात जुनी तंत्रनिकेतन संस्था आहे. सन १९१४ मध्ये १६ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने सुरू झालेल्या संस्थेत आज दोन हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. यंदाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने निरनिराळ्या कार्यशाळा, स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे. शताब्दी वर्षाचा समारोपीय कार्यक्रम सोहळा डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती गुलाबराव ठाकरे यांनी दिली. यावेळी शासकीय तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य दीपक कुळकर्णी उपस्थित होते.शताब्दी वर्षाची सुरुवात रक्तदान व नेत्रदानानेतंत्रनिकेतनच्या शताब्दी सोहळ्याची सुरुवात औपचारिक कार्यक्रमाने करण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिर, वादविवाद स्पर्धा, वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा अशा स्पर्धा घेण्यात आल्या. १०० व्या वर्षानिमित्त संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी रक्तदान करून १०० बाटल्या रक्त जमा केले तर १०० जणांनी नेत्रदानाचे अर्जदेखील भरले, अशी माहिती संस्थेचे प्रभारी प्राचार्य दीपक कुळकर्णी यांनी दिली.याशिवाय संस्थेतील जुन्या विद्यार्थ्यांसाठी ‘पॉलिटेकमित्र’ या नावाने ‘अ‍ॅल्युम्नी असोसिएशन’ची नोंदणी करण्यात आली आहे. माजी विद्यार्थ्यांनी स्र१्रल्लू्रस्रं’@ॅस्रल्लँस्र४१.ंू.्रल्ल या ‘ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)