शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

गोसेखुर्द प्रकल्प मार्च-२०२२ पर्यंत पूर्ण होणार  : हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 11:39 PM

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन मुदत दिली आहे. त्यांच्यानुसार हा प्रकल्प आता मार्च-२०२२ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत ७६३ प्रकल्पांचे काम पूर्ण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन मुदत दिली आहे. त्यांच्यानुसार हा प्रकल्प आता मार्च-२०२२ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. याशिवाय महामंडळाने वर्धा जिल्ह्यातील लोवर वर्धा प्रकल्प डिसेंबर-२०२०, यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्प मार्च-२०२१ तर, अमरावती जिल्ह्यातील लोवर पेढी प्रकल्प डिसेंबर-२०२१ पर्यंत पूर्ण करू अशी ग्वाही दिली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.प्रतिज्ञापत्रातील अन्य माहितीनुसार, विदर्भातील सिंचन प्रकल्पांमध्ये २३ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची क्षमता असून जून-२०१९ पर्यंत १३.१६ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली. आतापर्यंत ७६३ सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३१४ प्रकल्पांचे काम सुरू असून त्यातील १५६ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ३१४ प्रकल्पांमध्ये ९ मोठे, २१ मध्यम व १६७ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. जून-२०१९ पर्यंत १५६ मधील १४५ (मोठे-४, मध्यम-१४, लघु-१२७) प्रकल्पांचे काम जवळपास पूर्ण झाले होते तर, ११ प्रकल्प (मोठे-२, मध्यम-४, लघु-५) अंतिम टप्प्यात होते. अन्य १४ प्रकल्प (मोठे-३, मध्यम-२, लघु-९) वन विभागाच्या मान्यतेसाठी थांबलेले आहेत तर, १४ (मध्यम-१, लघु-१३) प्रकल्प वन विभागाची मान्यता मिळाली नसल्यामुळे आणि ७ लघु प्रकल्प शेतकरी व इतरांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आले आहेत. ६ लघु प्रकल्प जल संधारण विभागाला हस्तांतरित करण्यात आले आहेत. यासंदर्भात जनमंच व अतुल जगताप यांच्या वेगवेगळ्या जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे.बँक हमीसाठी तापीचा अर्ज११ कोटी रुपयाची बँक हमी मुक्त करण्याचे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला निर्देश देण्यात यावे अशा विनंतीसह तापी प्रेसट्रेस्ड प्रॉडक्टस् कंपनीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. उच्च न्यायालयाद्वारे १५ सप्टेंबर २०१६ रोजी जारी आदेशानुसार कंपनीने २२ सप्टेंबर २०१६ रोजी ही बँक हमी सादर केली होती. विम्यापोटी कापण्यात आलेले १ कोटी ५३ लाख ८८ हजार ४६७ रुपये आणि दंडापोटी कपात करण्यात आलेले १० कोटी ५४ लाख ४४ हजार १९८ रुपयेही कंपनीने परत मागितले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प